विवेकानंदांच्या चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन

By Admin | Updated: September 15, 2014 00:13 IST2014-09-14T21:56:42+5:302014-09-15T00:13:25+5:30

स्वामी विवेकानंद यांची चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ उभारण्याचा संकल्प ओतारी कुटुंबीयांनी केला आहे

Permanent display of Vivekananda paintings | विवेकानंदांच्या चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन

विवेकानंदांच्या चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन

चिपळूण : शहरालगत असलेल्या वालोपे गावी रेल्वे स्टेशनसमोर १३ गुंठे जागेत स्वामी विवेकानंद यांची चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ उभारण्याचा संकल्प ओतारी कुटुंबीयांनी केला आहे.
कोणत्याही प्रकारचे शास्त्रोक्त कला शिक्षण न घेता केवळ वारसा हक्काने चालत आलेल्या कलेच्या साथीला जिद्द, परिश्रम, सातत्य आणि स्वामी विवेकानंदांवर असलेली निस्सिम भक्ती, श्रद्धा गेली अनेक वर्षे हेमलता ओतारी तथा ओतारीआई यांची अव्याहतपणे सुरु आहे. त्यांची योग अभ्यासक आणि प्रशिक्षक अविनाश देवनाळकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या कलाकाराला जागे केले. त्यांच्या जीवनातील हा टर्निंग पॉर्ईंट महत्त्वाचा होता.
देवनाळकर हे स्वामी विवेकानंदांचे निस्सिम शिष्य. त्यांनी ओतारी आर्इंना स्वामींचा एक फोटो दिला आणि रंग व कुंचला घेऊन विवेकानंद साकारा, असा सल्ला नोंव्हेंबर २००० मध्ये दिला. गुरुंचा आदेश मानून त्यांनी स्वामींचे चित्र साकारले. त्यानंतर आतापर्यंत स्वामींच्या व गुरु रामकृष्ण परमहंसांच्या विविध भावमुद्रा चित्र स्वरुपात त्या सातत्याने साकारत राहिल्या. वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ओतारीआई यांनी साकारलेल्या या कलाकृती त्यांच्यासह इतरांनाही आनंद देत आहेत. एक वेगळ्या प्रकारची अनुभूती त्यातून मिळत आहे. यातच त्यांच्या चित्रकलेतील यशाचे रहस्य आहे. चित्र कायमस्वरुपी प्रदर्शनात ठेवण्यासाठी वालोपे येथे एक हॉल व रामकृष्ण परमहंस यांचा मठ ओतारी कुटुंबीय उभारणार आहेत. यातून विवेकानंदांचे जीवनदर्शन कलारसिकांना होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Permanent display of Vivekananda paintings