साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:26 IST2019-08-24T10:21:53+5:302019-08-24T10:26:31+5:30

सातारा येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली.

Panic by gangs carrying sharp weapons in Satara | साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशत

साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशत

ठळक मुद्देसाताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशतनागरिकांमध्ये खळबळ : अपार्टमेंटवर तुफान दगडफेक

सातारा : येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, पूर्वी झालेल्या वादातून दहा ते बाराजणांनी शुक्रवारी रात्री हातात धारदार शस्त्र आणि काठ्या घेऊन जोरजोरात ओरडत दहशत माजविण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे असणाऱ्या एका अपार्टमेंटवर संबंधित टोळक्याने तुफान दगडफेकही केली.

यामध्ये अपार्टमेंटच्या खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जादा कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी काही संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत पुढे आले नव्हते. पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Panic by gangs carrying sharp weapons in Satara