शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पालला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्यावेळी भाविकांना मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

पाल येथील खंडोबा-म्हाळसा मूर्तींच्या विवाह सोहळ्यासह होणारी यात्रा दि. २३ ते २९ जानेवारी या कालावधीत दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणार ...

पाल येथील खंडोबा-म्हाळसा मूर्तींच्या विवाह सोहळ्यासह होणारी यात्रा दि. २३ ते २९ जानेवारी या कालावधीत दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणार होती. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे विवाह सोहळा. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. यंदा ही यात्रा भरल्यास गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

यात्रा कालावधीत विवाह सोहळा, खंडोबा देवाची पूजाअर्चा, धार्मिक विधी मानकरी व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत केले जाणार आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २३ ते २९ जानेवारी या यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुकाने, स्टॉल लावण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी होणारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

- चौकट

दर्शनासाठी मंदिर बंद

यात्रा कालावधीत धार्मिक विधी झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच धार्मिक विधीचे ठिकाण सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.