शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्य नव्हे; आता कामच बोलेल!

By admin | Updated: November 11, 2014 00:03 IST

शिवेंद्रसिंहराजे : पोस्टमॉर्टेम न करता नाराजी दूर करेन

सातारा : ‘मी कधीही मताधिक्याची अपेक्षा ठेवून निवडणूक लढवली नाही. जनतेचा कौल मी स्वीकारला आहे. झाले गेले विसरून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘साविआ आणि नविआ’ या दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी निवडणुकीत कोण कमी पडले आणि कोणी मताधिक्य दिले या चर्चेच्या गुऱ्हाळात न अडकता विकासकामांकडे लक्ष द्यावे,’ असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ‘२००९ च्या निवडणुकीत मला विक्रमी मते मिळाली होती. सातारा शहरात मला यंदा कमी मते मिळाली; मात्र जनतेचा कौल मी मान्य केला असून, शहरातील समस्या सोडवून मी नागरिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मला मताधिक्य मिळाले नाही. कोणी काम केले, कोणी केले नाही, मला कमी मते मिळाली का जास्त मिळाली यावर कोणी चर्चा करावी, असे मला वाटत नाही. हा विषय आता कालबाह्य झाला असून, या विषयापेक्षा मी कामाला महत्त्व देतो. त्यामुळे दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी चुका सुधारून जोमाने कामाला लागावे,’ (प्रतिनिधी)विकासासाठी हातभार लावाकोणाकडून काय चुका झाल्या, हे ज्याचे त्याला माहीत आहे. त्यामुळे झालेल्या गोष्टींचे भांडवल करून या चुका सुधारणार आहेत का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. माझ्या मताधिक्यासाठी कोण झटलं आणि कोण कमी पडलं या चर्चेत अडकण्यापेक्षा सर्वांनी साताऱ्याच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.