शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

‘सातबारा’वरील नवीन शर्त होणार कमी

By admin | Updated: November 23, 2015 00:26 IST

धोम धरणग्रस्तांसाठी शुभवर्तमान : वासोळे, आसगाव येथे मंगळवारी विशेष शिबिर

कोरेगाव : धोम प्रकल्पामुळे सातारा व कोरेगाव तालुक्यांत पुनर्वसित झालेल्या खातेदारांच्या साताबारा उताऱ्यावरील नवीन अविभाज्य शर्त कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मंगळवार, दि. २४ रोजी सातारा तालुक्यातील वासोळे व कोरेगाव तालुक्यांतील आसगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या संदर्भात कृष्णा प्रकल्पग्रस्त विकास व ज्ञान प्रबोधन संस्थेचे सचिव व धोम प्रकल्पग्रस्त संघटनेचे सरपंच संजय शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने धोम प्रकल्पग्रस्तांचे सातारा व कोरेगाव तालुक्यांत पुनर्वसन करताना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नवीन अविभाज्य शर्त घालून दिली होती. त्यामुळे त्यांना जमीन विषयक व्यवहार करताना तसेच कर्ज प्रकरणे करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब आमदार शशिकांत शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून नवीन अविभाज्य शर्त कमी करण्यासाठी निर्णय घेण्यास भाग पाडले.वासोळे येथे शिबिरास प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण तर आसगाव येथील शिबिरास कोरेगावचे प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार रवी रांजणे, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र देगावकर यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी व संबंधित विभागाचे लिपिक उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांनी संधी सोडू नये : गाढवेकोरेगाव तालुक्यातील आसगाव, आसरे, चांदवडी, भिवडी, मुगाव, न्हाळेवाडी, वेलंग (शिरंबे), वेलंग (कण्हेरखेड), बोरीव, कोंढवली, परतवडी व गोवे गावांतील प्रकल्पग्रस्तांनी या संधीचे सोने करावे. भविष्यात त्यांना या विशेष शिबिरातील निर्णयांचा फायदा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन न्हाळेवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव गाढवे यांनी केले आहे.