कोयना कृषकवरील सभासदांचा विश्वास कौतुकास्पद : सुतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:20+5:302021-03-08T04:36:20+5:30

मल्हारपेठ, ता. पाटण येथे कोयना कृषक संस्थेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष नारायणराव सत्रे, ...

Members' faith in Koyna farmer is commendable: Carpenter | कोयना कृषकवरील सभासदांचा विश्वास कौतुकास्पद : सुतार

कोयना कृषकवरील सभासदांचा विश्वास कौतुकास्पद : सुतार

मल्हारपेठ, ता. पाटण येथे कोयना कृषक संस्थेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष नारायणराव सत्रे, संचालक साहेबराव देसाई, नथुराम पाटील, मंगल पाटील, इंदुबाई मुळीक, चंद्रकांत पाटील, भगवान माने, आदींची उपस्थिती होती. कोयना कृषक संस्थेच्या वार्षिक सभेतील ३१ मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद वाचन करण्यात आले. सभासदांना संस्थेच्या हितासाठी व्यवहार वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. व्यवस्थापक शंकर नांगरे यांनी मागील वर्षातील कार्यवृत्तांत वाचून कामकाजाची माहिती दिली. नारायणराव सत्रे यांनी भाग भांडवलावरील लाभांश सात टक्के जाहीर केला. चंद्रकांत पाटील यांनी अंदाजपत्रकास मान्यता देणे, साहेबराव देसाई यांनी वैधानिक लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती वाचन केले.

लेखापाल राजीव गोसावी, रोखपाल सुरेश कदम, संजय देसाई, आनंदा शेवाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक शंकर नांगरे यांनी स्वागत केले. संचालक नथुराम पाटील यांनी आभार मानले. (वा. प्र.)

फोटो : ०७केआरडी०४

कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथील कोयना कृषक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष बाबूराव सुतार यांचे भाषण झाले. (छाया : सुनील साळुंखे)

Web Title: Members' faith in Koyna farmer is commendable: Carpenter