शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मेढा शाळा पटक्रमवारीत जिल्ह्यात दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

कुडाळ : गतिमान युगातील पिढीच्या सर्जनशील विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविध कौशल्य विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मॉडेल स्कूल ही ...

कुडाळ : गतिमान युगातील पिढीच्या सर्जनशील विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविध कौशल्य विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मॉडेल स्कूल ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये जावळी तालुक्यातील मेढा प्राथमिक शाळेची निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येने जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेढा शाळा आहे. त्यामुळे आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे.

आदर्श शाळा म्हणून शैक्षणिक गुणवत्ता साधण्याकरिता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्य विकास साधणे, भाषा, गणित यातील मूलभूत संकल्पना प्राप्त होऊन मुलांमध्ये चिकित्सक विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागणे, नीतिमूल्य रुजवणे आणि त्यांच्यातील संभाषण कौशल्याचा विकास करणे, तसेच शाळेतील दप्तराचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला चालना देणारे विविध उपक्रम राबविणे. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडेही जाऊन ज्ञानाची कवाडे त्यांच्याकरिता खुली करण्यात येणार आहेत. आदर्श शाळेच्या या सर्वच निकषांची अंमलबजावणी मेढा शाळेत होत आहे.

सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी या सर्वच निकषांमध्ये ही शाळा पात्र ठरली आहे. जावली तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक उपक्रमशील असणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेली ही जिल्हा परिषदेची शाळा आहे.

यासाठी या शाळेतील शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत. ग्रामीण भागातील या शाळेची सर्वांगीण प्रगती पाहता इतरांना मार्गदर्शन ठरेल, अशा पद्धतीच्या आदर्श शाळेप्रमाणे या शाळेचे कामकाज पाहायला मिळत आहे.

निवडीबद्दल शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, शिक्षण विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अलका सपकाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी कौतुक केले आहे.

२०मेढा स्कूल

जावळी तालुक्यातील मेढा येथील याच प्राथमिक शाळेचा मॉडेल स्कूलसाठी समावेश झाला आहे. (छाया : विशाल जमदाडे)