शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची जुळवाजुळव!

By admin | Updated: May 21, 2015 00:11 IST

‘कृष्णा’चे धुमशान : २१ मे पासून खरी रणधुमाळी, इच्छुक उत्सुक

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. गुरुवार, दि. २१ पासून अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी सुरू होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी जुळवाजुळव दिसत आहे. कागदपत्रांची तपासणी अगोदरच वकिलांकडून करण्यात येत आहे.‘कृष्णे’च्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापकपॅनेल विरोधात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल रिंगणात उतरणार असल्याचे मानले जाते.यापूर्वीच्या अनेक निवडणुकींत मोहिते-भोसले कुटुंबातील संघर्षच ‘कृष्णे’ च्या निवडणुकीत पाहायला मिळाला; पण गत निवडणुकीत या मोहिते-भोसले कुटुंबीयांचे मनोमिलन झाले. कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मात्र ते मनोमिलन पटल्याचे निवडणूक निकालात दिसले नाही. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या रूपाने कृष्णेत खऱ्या अर्थाने सत्तांतर झाले, अशी चर्चा झाली. परंतु पाच वर्षांनंतर आज कृष्णाच्या निवडणुकीला सामोरे जाताना कौटुंबिक मनोमिलनाला तडा गेल्याचेच दिसत आहे. त्यामुळे तिरंगी लढत निश्चित मानली जाते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २१ ते २५ मे अशी पाच दिवसांची असली तरी यात रविवारची सुटी येत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी फक्त चार दिवसच मिळत असल्याने त्याची पूर्वतयारी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)अर्ज भरून ठेवा, मग बघू...तिन्ही पॅनेलमधून सध्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे समोरच्या पॅनेलचा उमेदवार ठरल्यानंतर आपले नाव निश्चित करू, अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. परिणामी, अनेकांना अर्ज तरी भरून ठेवा; मग बघू, अशा तोंडी सूचना दिल्याने इच्छुकांची गडबड सुरू आहे.