शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्म्यांच्या भुमीतील अंत्यविधी अंधारातच!

By admin | Updated: December 4, 2014 23:43 IST

वडूज स्मशानभुमीची दुरवस्था : स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचीही ओरडच...!

वडूज : आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, या अभंगाला साजेसे विधी व्हावेत, हीच माफक अपेक्षा सर्व स्तरातील लोकांची मरणानंतर असते. परंतु याला अपवाद वडूज येथील स्मशानभुमीच्या दुरवस्थेमुळे दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्याला परिचित असणारी हुतात्म्याची भूमी म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात नोंद असणारी वडूजनगरी ही विविध समस्यांमुळे सध्या चर्चेत आहे. परंतु येथील सर्व सोयी-सुविधा बरोबरीनेच मानवाच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी होणारा अंत्यविधी ही विविध समस्यांमुळे चर्चेत असून हा विधी अंधारातच करावा लागत असल्याची शोकांतिका स्मशानभुमीत पहावयास मिळत आहे. हा परिसर स्वच्छ असावा, पाण्याची विजेची समस्या नीटनेटकी असावी, यासाठी प्रारंभी प्रयत्न झाले. याबाबत उदासिनता असल्याचे प्रामुख्याने जाणविले. स्मशानभुमीत जाणाऱ्या रस्त्यालगतच शहरातील दैनंदिन कचरा गोळा करून याच परिसरात टाकला जात आहे.
हा कचरा रस्त्यावरच पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येरळा नदीच्या पात्राकडेलाच ही स्मशानभुमी असूनदेखील या ठिकाणी पाण्याची वानवा आहे. स्मशानभुमीपासून हाताच्या अंतरावर विजेचा खांब असूनही अंत्यविधी अंधारातच करावा लागत आहे.
या परिसरात बऱ्याचेळा बल्ब बसविण्यात आले. तसेच सौर उर्जेवरचे दिवे याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु काही समाजकंटकांनी याचीही विल्हेवाट लावली. त्यामुळे या सर्व कारणांचा शोध लावणे क्रमप्राप्त बनले आहे.
तालुक्याची राजधानी असलेल्या वडूजनगरीची लोकसंख्या पाहता ही स्मशानभुमी अंधारापासून मुक्त व सर्व सोयीनीयुक्त असणे काळाची गरज आहे. तसेच वडूज नगरीला जोडणारे उपनगर हे अंतर जादा असल्याने या भागात शववाहिका असणे आवश्यक आहे. तसेच हा परिसर स्वच्छ ठेऊन येथे अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व देखरेखीसाठी कामगारांची आवश्यकता आहे.
यासाठी सदर सोय-सुविधांसाठी ग्रामपंचायतीने मानसिकतेत बदल करून ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)


आता नाही येणे जाणे..!जसा जन्म तसाच मृत्यू असल्याची जाणीव असूनही त्या क्षणापुरता मानव भावनिक होऊन आपले मत व्यक्त करतो. परंतु निसर्गाच्या या चक्रापुढे हतबल होऊन याच स्मशानभूमीत ‘आता नाही... येणे... जाणे हा अभंग एक सुरात म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. त्यासाठी बदल घडवून ही समशानभूमी व्यवस्थीत करणे, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.