मकरंद पाटील यांच्या हस्ते मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाखांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST2021-07-29T04:38:25+5:302021-07-29T04:38:25+5:30

वाई : कोंढावळे येथील भूस्खलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधितून तातडीची मदत म्हणून ४ लाख ...

Makrand Patil handed over a check of Rs 4 lakh to the heirs of the deceased | मकरंद पाटील यांच्या हस्ते मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाखांचा धनादेश

मकरंद पाटील यांच्या हस्ते मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाखांचा धनादेश

वाई : कोंढावळे येथील भूस्खलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधितून तातडीची मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश आमदार मकरंद पाटिल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सरकारी विश्रामगृहावर आमदार पाटील यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून धनादेश वारसांकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अमर किर्दत, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, रमेश गायकवाड, मदन भोसले, मामा देशमुख, बाळासाहेब चिरगुटे, राहुल शिंदे, गणेश भोसले, तलाठी अमोल कुंभार, ग्रामसेवक रमेश निगडे, कृषी सहायक प्रशांत सोनावणे उपस्थित होते.

यावेळी कोंढावळे येथील भूस्खलनात मृत झालेल्य‍ा वामन बाबाजी जाधव यांचे वारस यशवंत वामन जाधव, राहिबाई मारुती कोंढाळकर यांचे वारस रामचंद्र मारुती कोंढाळकर व भीमाबाई सखाराम वाशिवले यांचे वारस पार्वती दत्तात्रय शिळीमकर यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून लवकरच एक लाखाचा धनादेश देण्यात येईल, असे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.

Web Title: Makrand Patil handed over a check of Rs 4 lakh to the heirs of the deceased