माहुली पुलावरून एकाची नदीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:02 IST2019-11-07T16:00:24+5:302019-11-07T16:02:08+5:30

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलावरून विजय शिवाजी गायकवाड (वय ४५, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साठेआठच्या सुमारास घडली.

From the Mahuli bridge, jump into the river | माहुली पुलावरून एकाची नदीत उडी

माहुली पुलावरून एकाची नदीत उडी

ठळक मुद्देमाहुली पुलावरून एकाची नदीत उडीबचाव पथकाच्या टीमला बोलविले

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलावरून विजय शिवाजी गायकवाड (वय ४५, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साठेआठच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय गायकवाड हे बुधवारी सकाळी माहुली येथील पुलावर आले. त्यानंतर त्यांनी अचानक पुलावरून कृष्णी नदीत उडी मारली. हा प्रकार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पाहिला.

काहींनी या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोलिसांनी शोध मोहीम थांबवून बचाव पथकाच्या टीमला बोलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गायकवाड यांचा थांगपत्ता लागला नव्हता.
 

Web Title: From the Mahuli bridge, jump into the river