शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा विजयी चौकार

By admin | Updated: April 27, 2015 00:16 IST

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : चारही गटात मिळविले विजेतेपद

सांगली (वसंतदादा पाटील क्रीडानगरी) : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील किशोर, किशोरी, पुरूष व महिला अशा चारही गटांवर आपले वर्चस्व राखत महाराष्ट्राने ‘रेकॉर्ड बे्रक’ विजयाची नोंद केली. चारही गटात विजेतेपद पटकावून महाराष्ट्राने देशभर आपला दबदबा कायम राखला. या यशानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धास्थळी विजयोत्सव साजरा करीत जोरदार आतषबाजी आणि जल्लोष केला.सर्व सामने विद्युतझोतात मॅटवर झाले. सामने पाहण्यासाठी स्पर्धास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी कुपवाडनगरी दुमदुमून गेली. शिवप्रेमी मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. किशोर गटातील विजेतेपदासाठी महाराष्ट्र विरूध्द तेलंगणा अशी लढत झाली. महाराष्ट्राचा प्रशांत वाघ, काशिलिंग हिरेकुर्ब व अथर्व वालेने वेगवान खेळ करून तेलंगणाला पराभवाचा धक्का दिला. किशोरी गटात महाराष्ट्र विरूध्द कर्नाटक अशी अंतिम लढत झाली. अनुभवी कर्नाटकला पराभूत करणे सोपे काम नव्हते. कर्नाटकने चिवट खेळ करून महाराष्ट्राला चांगलेच झुंजवले. चपळ महाराष्ट्र संघाने शेवटच्या टप्प्यात आक्रमक खेळ करून कर्नाटकला खिळखिळे केले आणि विजय मिळवला. पुरूष गटात महाराष्ट्र विरूध्द कोल्हापूर यांच्यात अटीतटीचा मुकाबला झाला. संस्थानकाळापासून खो-खोमध्ये स्वतंत्र दर्जा अबाधित राखलेल्या कोल्हापूरने चिवट खेळी केली. दोन्ही संघात मध्यंतरानंतर बरोबरी झाली. केवळ एका गुणाने महाराष्ट्राने हा सामना जिंकला. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला नमवून विजेतेपद आपल्या नावे केले. बक्षीस वितरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन पाटील होते. विजय कडणे व हणमंत सरगर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मनपा आयुक्त अजिज कारचे, सुरेश शर्मा, प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, नगरसेवक गजानन मगदूम, दीपक सूर्यवंशी, किशोर जामदार, विठ्ठल पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, डॉ. सुहास व्हटकर, देवेंद्र पाटील, राहुल सोलापुरे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या नियम पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. (क्रीडा प्रतिनिधी) किशोर गट : महाराष्ट्र (प्रथम)तेलंगणा (द्वितीय)कोल्हापूर (तृतीय)पश्चिम बंगाल (चतुर्थ)किशोरी गट : महाराष्ट्र (प्रथम)कर्नाटक (द्वितीय)गुजरात (तृतीय)पश्चिम बंगाल (चतुर्थ)पुरूष गट :महाराष्ट्र (प्रथम)कोल्हापूर (द्वितीय)आंध्र प्रदेश (तृतीय)पश्चिम बंगाल (चतुर्थ)महिला गट :महाराष्ट्र (प्रथम)कर्नाटक (द्वितीय)केरळ (तृतीय)पश्चिम बंगाल (चतुर्थ)