शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरकरांनी जपली सामाजिक बांधिलकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

महाबळेश्वर : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा याच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे मुन्नवर हौसिंग सोसायटीमध्ये रविवारी आयोजित केलेल्या ...

महाबळेश्वर : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा याच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे मुन्नवर हौसिंग सोसायटीमध्ये रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास तरुण व महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ६३ युवक व महिलांनी रक्तदान केले.

महाबळेश्वरमध्ये सकाळपासून मुसळधार पावसात तब्बल ६३ जणांनी रक्तदान केले. मुन्नवर हौसिंग सोसासटीमधील गणेश मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मुन्नवर हौसिंग सोसायटीचे चेअरमन ख्वाॅजाभाई वारूणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सोसायटीचे चेअरमन ख्वाॅजाभाई वारूणकर म्हणाले, ‘रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचविण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. म्हणून रक्तदान करणे टाळण्याचे कोणतेही कारण नाही. रक्तदान हे एक कर्तव्य आहे, तो आपल्या सर्वांचाच धर्म आहे.’

यावेळी व्हाईस चेअरमन रमेश आखाडे व अर्बन बँकेचे फकीरभाई वलगे, किरण शिंदे व ‘आरपीआय’चे सलमान मुलाणी व सोसायटीचे सभासद प्रदीप मानकुंबरे, नदीमभाई वारुणकर, अजमुद्दीन कुरेशी, रफिक वारुणकर, आनंद आरडे, रज्जाक डोंगरे, राहुल साळुंखे, दिलीप काळे, न्याजबी वारूणकर, अंजुम कुरेशी, अत्तरबानू कुरेशी, संगीता आखाडे, पूजा आखाडे, पल्लवी केसारकर, संगीता ढेबे, राणी शिगरे, मीनाक्षी पवार, रिजवाना पटेल, जमीला वारूणकर, अन्य महिला उपस्थित होत्या.

अक्षय ब्लड बँकेचे सतीश साळुंखे व ‘लोकमत’चे नीलेश आवळे, अजित जाधव हेही उपस्थित होते.

बी पॉझिटिव्ह : सलमान मुलाणी, करुणा ताथवडेकर, मुर्तूझा वारूणकर, समद मानकर, ऋषीकेश बावळेकर, नदीम वारूणकर, मीनाक्षी पवार, अजमुद्दीन कुरेशी, प्रदीप मानकुंबरे, अतिक वारूणकर, जुंबेर ताबोळी, रिझवाना पटेल, सलमान मुलाणी.

ओ पॉझिटिव्ह

संदेश तोडकर, महेश गायकवाड, शंतनू जाधव, निखिल सपकाळ, जमीर बडाणे, राकेश कदम, आसिफ वारूणकर, आशुतोष बिरामणे, रवींद्र दानवले, मंजू कोळी, अक्षय कांबळे, यासीन तांबोळी, रकिमुनिसा बडाणे, महेश देवकुळे, निलोफर बडाणे, किरण शिंदे, सुभाष मोरे, अंजुम कुरेशी, पूजा आखाडे, पांडुरंग ढेबे, ताहिर मुल्ला, राहुल ढाणक, अमरदीप बिरामणे, हृषीकेश मालुसरे.

एबी पॉझिटिव्ह : जमीला मुलाणी, आझाद मुलाणी, राणी शिंगरे, पल्लवी केसारकर.

ए पॉझिटिव्ह : नासीर वलगे, सुनील साळुखे, रोहित शिंगरे, सरिता ढेबे, इनायत महापुळे, करण आखाडे, अखिल मुल्ला, शादाब खान, दिनेश मोरे, कुणाल आखाडे, अलफाम वारूणकर, इना बडाणे, जाॅकी फर्नांडिस, काशीनाथ झोरे, संगीता आखाडे.

ओ निगेटिव्ह : प्रमोद पवार.