शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंचन’साठी खासगीकरण शेवटचा पर्याय

By admin | Updated: May 18, 2015 01:03 IST

संजय पाटील : वर्षभरात सिंचन योजनांसाठी भरीव प्रयत्न; राज्यपालांना भेटणार

सांगली : सिंचन योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्हाला यश मिळेल. योजना सक्षमपणे चालणे गरजेचे आहे. लोकहिताच्या योजना कोणत्याही गोष्टीसाठी अडचणीत येणार असतील, तर खासगीकरण हा शेवटचा पर्याय असेल, असे मत खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच सर्व लाभार्थी गावांमधून एकत्रितपणे पाण्याचे पैसे भरले गेले आणि सक्षमपणे ही योजना ज्यावेळी सुरू होईल तेव्हा अत्यंत नाममात्र पाणीपट्टी असेल. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूसह ज्या उपयोजना आहेत. त्यांच्यासाठी पुरेसा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. केंद्र शासनाने सिंचन योजनांना निधी देण्याऐवजी थेट राज्य शासनालाच त्यासाठीचा निधी वाढवून दिला आहे. राज्य शासनाकडून असा निधी मिळत असताना अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटून त्याविषयीची विनंती केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिंचन योजनांना शिस्त लागावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर या योजना अडचणीत येणार असतील, तर शेवटचा पर्याय खासगीकरणाचा असेल. त्याविषयीची चर्चा यापूर्वी झाली होती, पण आता लगेचच त्याबाबत विचार होणार नाही. शासनामार्फतच निधी मिळवून योजना पूर्णत्वास नेण्याचा तसेच पाणीपट्टीची शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्य शासनाच्या धोरणाबाबत ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त जागांचा अनुशेष भरून निघायला हवा. तोही आपल्याच महाराष्ट्राचा भाग आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्रावर राज्य शासन अन्याय करणार नाही. आम्हीही याठिकाणच्या योजनांसाठी पाठपुरावा करीत आहोत. (प्रतिनिधी)