शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाच्या स्थलांतराचा भुर्इंजमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 21:38 IST

सोनाईचीवाडीत दारूबंदी : दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब

सातारा : जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत ग्रामसभा झाल्या. काही ठिकाणी वादाचेही प्रसंग घडले. भुर्इंज येथे दारू दुकान स्थलांतराचा ठराव करण्यात आला. सोनाईचीवाडीत दारूबंदीचा ठराव तर फलटण तालुक्यातील दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली.भुर्इंज : सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करण्याबरोबरच भुर्इंज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.येथील छत्रपती शिवाजी मैदानावर सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. महामार्गालगत शैक्षणिक संस्थेच्या वाटेवर असणारे सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करून लोकवस्तीपासून दूर नेण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना सरपंच कांबळे यांनी दिल्या. विविध समाजांची स्मशानभूमी व अंत्यसंस्कार यांचा दाखला देत एकाच स्मशानभूमीत सर्व जाती जमातीच्या लोकांनी अंत्यसंस्कार करावेत, यासाठी सरपंच कांबळे यांनी प्रबोधन कले. विषय पत्रिकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी विष्णू चव्हाण यांनी केले. चंद्रदीप भोसले यांनी आभार मानले. मल्हारपेठ : सोनाईचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.सोनाईचीवाडी, ता. पाटण येथे उपसरपंच सचिन माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. गावच्या विकासासाठी पहिले पाऊल म्हणून गावातील दारू धंदा बंद करण्यासाठीची सूचना पुढे आली. त्यानंतर सर्वांनुमते ठराव मंजूर करून लगेच अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले. ग्रामसेवक परमेश्वर पाखरे यांनी शासकीय योजना, अभियान या परिपत्रकांचे वाचन केले. यावेळी जे. के. कदम, शहाजी काळे, आनंदा काळे, सुरेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दुधेबावी : दुधेबावी , ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला पुरेसे ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे वेळेच्या अर्ध्या तासानंतर कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली, अशी माहिती सरपंच ज्योती मोरे यांनी दिली.यावेळी उपसरपंच श्रीमंत नाळे, पोलीस पाटील हणुमंत सोनवलकर, लता नाळे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, डॉ. एस. पी. इंगवले, डॉ. संतोष कराडे, नाना सोनवलकर, विकास सोनवलकर, दिगंबर सोनवलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या ग्रामसभेला सुमारे ६५ ग्रामस्थ उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १०० ग्रामस्थ किंवा मतदाराच्या १५ टक्के ग्रामस्थांची उपस्थिती गरजेची असते. तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने आता ग्रामसभा दि. २१ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली. (वार्ताहर)