शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो दिव्यांनी उजळला कृष्णा घाट

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

वाईत दीपोत्सव : दीपमाळ प्रज्वलित; नदीपात्रात सोडले हजारो दिवे

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईनगरीतील कृष्णा नदीतीरावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावण्यात आलेल्या शेकडो दिव्यांनी कृष्णाघाट उजळून निघाला. या दीपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. वाईच्या दीपोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. याबाबत आख्यायिका अशी की, शंकराने त्रिपुरा सुराचा वध त्रिपुरा पौर्णिमेदिवशी केला. चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिव व विष्णू यांची भेट होते. म्हणून त्यावेळी बेल आणि तुळशीची पाने वाहिली जातात. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाई येथील कृष्णा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. गुरुवारी सायंकाळी मंदिरासमोरील दगडी दीपमाळ प्रज्वलीत करण्यात आली. वाई शहरातील नागरिकांनी घाटावर येऊन द्रोणात दिवे प्रज्वलित करून ते नदीपात्रात सोडले. यामुळे लखलख चंदेरी दुनियेत प्रवेश केल्याचा भास निर्माण झाला होता. तेजानं न्हाऊन निघालेला परिसर मोहित करत होता. (प्रतिनिधी)सातही घाटांवर उजळले दीपवाईत कृष्णा नदीवर सात घाट असून प्रत्येक घाटावर कृष्णामाई संस्थानच्या वतीने दिवे प्रज्वलित केले जातात. महागणपती घाटावरील काशीविश्वेश्वर व फुलेनगरला भद्रेश्वराचे पूजन करण्यात आले. येथील शंकराच्या मंदिरात सातशे पन्नास दीप उजळविण्यात आले. घाटावर सर्व ठिकणी संस्थानच्या वतीने दीपोत्सव केला जातो. यावेळी नागरिक विशेषत: महिला भाविक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर जमले होते. त्यांनी नदीपात्रात दिवे प्रज्वलित करून सोडले. या दीपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.