शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

सोबत्याला वाचविल्यानंतरच थांबली ‘काव-काव’!

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

पक्ष्यांची युक्ती फळास : मांजात अडकलेल्या कावळ्याची केली सुटका

सातारा : वेळ दुपारी एकची. सदर बझार येथील एका बंगल्याच्या आवारातील एका झाडाभोवती सुरू होती कावळ्यांची काव-काव. जणू ते मागत होते मदतीचा हात... कारण त्यांचा एक सोबती झाडावर लटकलेल्या पतंगाच्या माज्यात अडकून सुटकेसाठी फडफडत होता. जिवाच्या आकांतानं ओरडत होता. अचानक झालेल्या कावळ्यांच्या आवाजानं तेथेच काम करत असलेल्या काही कामगार युवकांनी झाडाकडे धाव घेतली अन् प्रयत्न करून मांज्यातून कावळ्याची सुटका केली.पक्ष्यांमध्ये कावळा बुद्धिमान म्हणून ओळखला जातो. म्हणूनच मांज्यात अडकलेल्या आपल्या सोबत्याला वाचविण्यासाठी त्यांनी काव-काव करून माणसाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हुशार कावळ्यांनी आपल्या सोबत्याला वाचविण्यासाठी केलेली युक्ती फळास आली, अशीच चर्चा हा प्रकार पाहणाऱ्यांमध्ये सुरू होती.सदर बझार येथील पाटील बंगल्याच्या आवारातील चिंचेच्या झाडावर लटकलेल्या मांज्यात मंगळवारी दुपारी एक कावळा अडकला होता. त्याने सुटकेसाठी प्रयत्न केला; पण तो मांज्यात जास्तच अडकत गेला. सुटका होत नसल्यामुळे त्याने काव-काव करून आपल्या सोबत्यांना बोलावले अन् काही वेळातच कावळ्यांचे थवेच्या थवे झाडाभोवती घिरट्या घालत ओरडू लागले. आसपासच्या घरांवरही कावळ्यांचे थवे बसले होते. दरम्यान, अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांच्या बंगल्यात प्लंबिंकचे काम करत असलेले अमन संदे, बबलू बागवान, तन्वीर बागवान, आकीब शेख या कामगारांनी प्रयत्न करून अडकेल्या कावळ्याची सुटका केली. त्याला सोडल्यानंतर काही क्षणातच इतर कावळ्यांची काव-काव थांबली अन् आपल्या सोबत्याला सुखरूप पाहून कावळ्यांचे थवे उडून गेले. (प्रतिनिधी)कावळ्याच्या सुटकेसाठी चौघांचे तासभर प्रयत्नकावळ्यांचा गोंधळ ऐकून जवळच प्लंबिंगचे काम करणाऱ्या कामगारांनी झाडाकडे जाऊन पाहिले असता उचं ठिकाणी मांज्यात अडकलेला कावळा त्यांना दिसला. झाडावर चढून कावळ्याची सुटका करणे अवघड होते, त्यामुळे कामगारांनी लिंबदोरच्या साह्याने मांजा तोडला. त्यामुळे कावळा थोडा खाली आला. त्यानंतर लोखंडी पाईपने त्याला हळूहळू खाली खेचले. हा प्रकार सुरू असताना इतर पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. एक तासाच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या कावळ्याला पिशवीने पकडून त्याच्या पंखात अडकलेला मांजा कटरने अन् कावळ्याने आकाशी भरारी घेतली.