शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड येथेही गटबाजी चव्हाट्यावर

By admin | Updated: August 22, 2014 22:06 IST

महायुतीतील इतर स्थानिक नेतेही विमानतळावर अनुपस्थित

कऱ्हाड : येथील विमानतळावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिवकर रावते यांचे शुक्रवारी सकाळी स्वागत करण्यात आले. कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील शंभरवर शिवसैनिक स्वागताला उपस्थित होते खरे; पण त्यांच्यातील गटबाजी येथेही चव्हाट्यावर आली.माजी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह नरेंद्र पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नंदकुमार घाडगे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, संजय मोहिते, तात्या घाडगे हे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच भगव्या झेंड्याच्या गाड्या विमानतळावर दिसत होत्या. शिवसैनिक स्वागताला आले खरे; पण त्यांच्यातही गटबाजी दिसत होती. कऱ्हाड तालुक्यातील दोन गट स्वतंत्रपणे उभे होते. तर पाटण तालुक्यातील मूळचे शिवसैनिक स्वतंत्र उभे होते, आणि शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या गटाचे कार्यकर्ते विश्रामगृहात बसून होते. अकरा वाजण्याच्या सुमारास विमानाचे आवाज येऊ लागताच शिवसैनिक प्रवेशद्वाराजवळ जमले. विमान लॅन्ड झाल्यावर देसाई विश्रामगृहातून उठले आणि मागून येऊन थेट विमानाजवळ ठाकरेंच्या स्वागताला गेले. त्यावेळी घोषणा देणारे मूळ शिवसैनिक लांबच होते. मतभेदामुळे उपस्थित पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते संवाद साधतानाही दिसत नव्हते. (प्रतिनिधी)भगवी शाल आणि बुकेशंभूराज देसाई यांनी आज (शुक्रवारी) भगव्या रंगाचा खादीचा शर्ट परिधान केला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे आपसूक जात होते. तर उद्धव ठाकरेंचे विमानतळावर स्वागत करतानाही त्यांनी भगवी शाल आणि बुके दिला. शंभूराज आत आणि जिल्हाप्रमुख बाहेरउद्धव ठाकरे विमानतळावरील विश्रामगृहात पाच मिनिटांसाठी थांबले होते. त्यादरम्यानही दिवाकर रावते हे शंभूराज देसार्इंच्या बरोबर होते; पण ज्यांच्या खांद्यावर पक्षाने नुकतीच जिल्ह्याची धुरा ठेवली आहे, ते जिल्हाप्रमुख हर्षद कदम आणि नंदकुमार घाडगे यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.