पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:50 IST2019-09-07T13:47:48+5:302019-09-07T13:50:28+5:30

पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.

The incident took place at Moti Chowk in Satyar by the husband of his wife | पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

ठळक मुद्देपत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवूनसाताऱ्यातील मोती चौकातील घटना

सातारा : पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत.

विजय श्रावण जाधव (वय ४५, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून मोती चौकामध्ये गजरा विकण्याचे काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे ते नेहमी मानसिक तणावाखाली असायचे. गुरूवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे गजरा विकण्यासाठी मोती चौकात आले.

गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे चौकात नेहमीपेक्षा नागरिकांची गर्दी जास्त होती. अचानक बाटलीतून आणलेले पेट्रोल जाधव यांनी स्वत:च्या अंगावर ओतले. काढी ओढून स्वत:ला पेटवूनही दिले. हा प्रकार त्यांच्या शेजारी असणाऱ्या इतर विक्रेत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला.

काही मिनिटांतच आग विझवली गेली. यामध्ये जाधव हे ५० टक्के भाजून गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली. जाधव यांचे मित्र धीरज घाडगे यांनी जाधव यांना रिक्षातून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

साताºयातील भर वस्तीमधील गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. विजय जाधव यांना सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. यामध्ये त्यांनी पत्नीच्या विरहामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नमूद केले आहे. जाधव यांना एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: The incident took place at Moti Chowk in Satyar by the husband of his wife