कारची उभ्या मालट्रकला मागून धडक मामा भाच्यासह बहिणीचा मृत्यू, मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:12 PM2023-10-14T14:12:31+5:302023-10-14T18:15:21+5:30

Kolhapur News: कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचाराही या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.

In an accident on the Pune-Bangalore highway; 3 killed including police personnel | कारची उभ्या मालट्रकला मागून धडक मामा भाच्यासह बहिणीचा मृत्यू, मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

कारची उभ्या मालट्रकला मागून धडक मामा भाच्यासह बहिणीचा मृत्यू, मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

मलकापूर - कारची उभ्या मालट्रकला पाठिमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तीघे जागीच ठार झाले आहेत. पुणे-बंगळूरु महामार्गावर पाचवडफाट्या नजीक शनिवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. कार मालट्रक खाली आहे त्या वेगात घूसाल्याने मेतदेह कारमध्येच आडकून पडले होते. प्राथमीक माहितीनुसार मृतांमध्ये राजवाडा पोलिसठाणे कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासह बहिण व भाच्चा चा समावेश आहे. अपघातानंतर दीडतास वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलिस कर्मचारी नितीन बापूसाहेब पोवार (वय ३४ रा. कोल्हापूर ), मनीषा आप्पासाहेब जाधव (वय ४२) व अभिषेक आप्पासाहेब जाधव (वय २६ दोघेही रा. मु. पो. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आशी आपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी की, नातीन पोवार हे कार (क्रमांक एम एच ०१ ए एल ५४५८) मधून बहिण वा भाच्च्याला घेऊन कोल्हापूरकडून पुण्याकडे जात होते. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेल जवळ आले असता महामार्गाकडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रक ला भरधाव वेगात पाठिमागून जोरदार धडक झाली. धडक एवढी जोरात होती कि कार बंपर तोडून मालट्रकच्या चाकापर्यत घुसली होती. या अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. देखभालच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांसह कराड शहर व तालुका पोलिसांना दिली.

तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपघाताची माहिती घेऊन कारमध्ये आडकलेले मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिले. आपघात ग्रस्त वाहणे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दीड तासाच्या प्रयत्नानंतर मृतदृह काढण्यात यश 
कारमधील तिघांचेही मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत कारमध्येच अडकून पडले होते. परिसरातील नागरिकांसह महामार्ग देखभालचे दस्तगिर आगा, जगदिश जंगम, तानाजी पाटील , महेश फल्ले, आमृत बाबर, कोंडीबा गोसावी, प्रसाद फले, राहूल कदम, सुनिल कदम या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने  चेपलेल्या कारमधून दीड तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले.

कार्राक्रम आर्ध्यावर सोडून अधिकारी अपघास्थळी
महामार्ग पोलिस चौकीचा उद्घाटन समारंभ सुरू होता. या कार्यक्रमाला सर्वच पोलिस आधिकारी उपस्थित होते. आपघाताची माहिती मिळताच कराडचे पोलिस उपअधिक्षक अमोल ठाकूर, महामार्ग पोलीस निरीक्षक भारत पाटील, कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील, कराड शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील, महामार्ग पोलिस चौकीचे पोलिस उपनारीक्षक प्रकाश उथळे, यांच्यासह कर्मचारी कार्क्रम सोडून तात्काळ घाटनास्थळी दाखल झाले.

Web Title: In an accident on the Pune-Bangalore highway; 3 killed including police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.