शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींचे धरण साडेतीनशे कोटींवर !

By admin | Updated: April 17, 2015 00:14 IST

वांग-मराठवाडीचे काम अद्याप अपूर्णच : वीस वर्षांत तीनवेळा काम बंद पडले, बुडीत क्षेत्रही अद्याप कोरडे

सणबूर : वांग-मराठवाडी धरणामुळे पाटण तालुक्यातील २ हजार ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या धरणासाठी आजपर्यंत सुमारे साडेतीनशे कोटी खर्च झाले आहेत. मात्र, तरीही धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी व स्थलांतरीत झालेले धरणग्रस्त यांचे हाल सुरू आहेत.सध्याच्या पुनर्वसित गावांचा खर्च शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. तो खर्च वांग-मराठवाडी धरण पूर्ण झाल्यावरच थांबणार आहे. शासनाने धरणाच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला तरच धरणाच्या कामाला गती येईल. सध्या दुष्काळावर होणारा खर्च धरणाच्या कामाला झाला असता तर बराच दुष्काळ कमी झाला असता. ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना जमिनी देण्यात आल्या ते ठिकाण लाभक्षेत्र म्हणून शासनाने घोषित केले आहे. त्या ठिकाणच्या जमिनीला पाणी मिळालेच पाहिजे. शासनाने त्यांना पाणी दिले नाही, तर नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार संबंधित धरणग्रस्तांना प्रतिमहिना तीन हजार रुपये शासनाने देण्याची तरतूद कायद्यामध्येच आहे. त्यामुळे हा होणारा खर्च शासनावरच पडणार आहे. ही मागणीही धरणग्रस्तांनी चळवळीच्या माध्यमातून शासनाकडून मान्य करून घेतली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात बागायती जमीन मिळविण्याची खात्री धरणग्रस्तांना झाली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून सिंचन प्रकल्प व सिंचनाच्या योजनेसाठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे. यापूर्वी आघाडी सरकारकडून धरणग्रस्तांना खास बाब म्हणून वेगळा निधी दिला जात होता. त्याचप्रमाणे युती शासनाने याच धोरणावर निधी उपलब्ध करून द्यावा व सिंचनाच्या योजना पूर्ण कराव्यात, अशी धरणग्रस्तांची मागणी आहे. धरणग्रस्तांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले आहे, त्याठिकाणी त्यांनी जमिनी उपलब्ध आहेत. त्याठिकाणी गावठाण आणि सर्व नागरी सुविधाही उपलब्ध असताना धरणग्रस्त त्याठिकाणी राहण्यास जात नाहीत. १९ वर्षांच्या कालावधीत धरणाचे काम तीन वेळा बंद पडले. कधी निधीअभावी तर कधी धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे. सुरुवातीला धरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी हे धरण ८६ कोटींचे होते. मात्र १९ वर्षांच्या कालावधीत हे धरण ३२५ कोटींवर गेले आहे. मात्र, तरीही अद्याप धरणाचे ४० टक्के काम बाकी आहे. यापुढे या धरणाला अजून किती खर्च होईल, हे सांगणेही कठीण बनले आहे. तसेच प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनी शासनाच्या ताब्यात असूनसुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाणीसाठा होत नाही. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी व स्थलांतर झालेले धरणग्रस्त या दोघींचेही हाल होत आहेत. (वार्ताहर) दुष्काळी भागालाही फायदाप्रत्येकवर्षी मार्च ते जून महिन्यांपर्यंत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याबरोबरच रब्बी हंगामात या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. शिवाय दुष्काळग्रस्त भागाला या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव व खानापूर तालुक्याला या धरणाच्या पाण्याचा लाभ होणार आहे. असे असतानाही अद्याप या धरणाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे.वांग-मराठवाडी धरण निधीअभावी तर कधीकधी आंदालनामुळे बंद पडले. ते सुरू होण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत, तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीला शासनाने पाणी द्यावे, अशी आमची मागणी आहे. - जगन्नाथ विभुते, सदस्य, श्रमिक मुक्ती दल