शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीने वार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

अमृत दिनकर भोसले (रा. कोंजावडे, ता. पाटण) असे शिक्षा सुनालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. मिलिंद ...

अमृत दिनकर भोसले (रा. कोंजावडे, ता. पाटण) असे शिक्षा सुनालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंजावडेतील अमृत भोसले याच्या नात्यातील मुलीने प्रेमविवाह केला होता. या विवाहास अमृतचा विरोध होता. मात्र, मुलीने विवाह केल्यामुळे अमृत रागात होता. याच रागातून त्याने संबंधित मुलीचा पती व त्यांचा सावत्र भाऊ यांच्यावर गुप्तीने वार केले होते. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. याबाबतचा गुन्हा पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.

जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाने या खटल्यात सतरा साक्षिदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षिदारांच्या साक्ष ग्रहीत धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवित वेगवेगळ्या दोन कलमांसाठी प्रत्येकी चार वर्ष सक्तमजुरी व तीनशे रुपये दंड तसेच एका कलमाखाली तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीनशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावी लागणार आहे.