शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किरणच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

By admin | Updated: November 22, 2015 00:02 IST

दोन चिमुरडी पोरकी : विठ्ठलवाडीत अंत्यसंस्कार

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील विठ्ठलवाडी-तुळसण येथील चव्हाण कुटुंबीय सुरुवातीपासूनच अध्यात्मिक़ गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात या कुटुंबाचा सक्रिय सहभाग असायचा. दोन दिवसांपूर्वीही किरण हा त्याची आई व बहिणीसमवेत कार्तिक वारीसाठी पंढरपूरला गेला; मात्र त्याचठिकाणी शुक्रवारी रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विठ्ठलवाडी हे किरणचे मूळगाव. आई बाळाबाई, भाऊ धनाजी, वहिनी हर्षलता, बहीण अश्विनी, पत्नी सोनाली तसेच एक वर्षाची मुलगी व तीन महिन्यांची मुलगा असा किरणचा परिवार. आई बाळाबाई या धार्मिक कार्यक्रमात सहभागी असायच्या. त्याचबरोबर इतर कुटुंबीयांनाही अध्यात्माची ओढ होती. चार दिवसांपूर्वी या कुटुंबाने कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्याचे नियोजन केले. विठ्ठलवाडीतून किरण त्याची आई व बहीण तसेच इतर गावांहून त्यांचे पाहुणे कार्तिक वारीला येणार होते. त्यासाठी या कुटुंबीयांनी खासगी जीपही ठरवली. गुरुवारी सकाळी सर्वजण विठ्ठलवाडीतून पंढरपूरला मार्गस्थ झाले. गुरुवारी दुपारी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळी त्यांनी देवदर्शन घेतले. मंदिर परिसरातच त्यांनी राहण्यासाठी खोलीही भाडेतत्त्वावर घेतली होती. शुक्रवारी रात्री सर्वजण खोलीमध्ये असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरण ‘फिरून येतो,’ असे सांगून रूममधून बाहेर पडला. त्यानंतर तो रेल्वे रुळाकडे गेला. त्याठिकाणी तो कानात हेडफोन घालून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी कुटुंबीयांना सांगितले. मोबाईलवर बोलत असताना त्याला रेल्वेचा आवाज आला नाही. परिणामी, रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी किरणचा मृतदेह गावी विठ्ठलवाडी येथे आणण्यात आला. त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. (प्रतिनिधी)