‘गुडमॉर्निंग मोहीम’ जिल्ह्यात थंडावली

By Admin | Updated: December 2, 2014 21:27 IST2014-12-02T21:09:17+5:302014-12-02T21:27:17+5:30

दुर्गंधीचे साम्राज्य : अनेक गावांना ‘निर्मलग्राम’चाही विसर

Good morning campaign thundits in the district | ‘गुडमॉर्निंग मोहीम’ जिल्ह्यात थंडावली

‘गुडमॉर्निंग मोहीम’ जिल्ह्यात थंडावली

सणबूर : जिल्ह्यात ‘गुडमॉर्निंग मोहीम’ थंंडावली असल्याने निर्मलग्रामच्या वाऱ्यालाच लगाम लागल्यासारखी स्थिती आहे़ त्यामुळे तालुक्याच्या विविध भागांत अगदी गावाशेजारील सेवारस्त्यावर उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे़
निर्मलग्राम योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी जिल्ह्यातील गावांनी ही योजना प्रभावीपणे राबविली़ सार्वजनिक शौचालयासह घरोघरी शौचालये उभी राहिली़ त्याच कालावधीत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘गुडमॉर्निंग मोहीम’ सुरू झाली़ या मोहिमेचा अनेकांवर मोठा वचक बसला होता़ मात्र, सध्या ती मोहीम थंडावली आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणी सेवारस्त्याचा वापर शौचासाठी होत आहे़ अनेक ठिकाणी शौचालये असूनही त्याचा वापर होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे़ त्यामुळे निर्मलग्राम योजना कागदावरच राहिली की काय, असे चित्र आहे़ (वार्ताहर)

Web Title: Good morning campaign thundits in the district