शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

३१०० रूपये भाव द्या; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

दहा दिवसांचा अल्टिमेटम : ‘बळिराजा’ शेतकरी संघटनेचा कऱ्हाडात मोर्चा

कऱ्हाड : ‘उसाला ३१०० रुपये प्रतिटन भाव द्या; अन्यथा येत्या दहा दिवसानंतर संपूर्ण राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून असहकार आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू, त्याची सुरुवात आजच्या मोर्चाने करण्यात आली आहे,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.
संघटनेच्या वतीने आज येथील टाऊन हॉलपासून बसस्थानक, दत्त चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड करण्यात आली. ‘राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने आता ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत,’ असे सांगतानाच ‘बळीराजा’च्या नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडविली. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांच्या संपत्तीचा विषयही काही नेत्यांनी या वेळी उपस्थित केला. ‘बळीराजा’ ही अराजकीय संघटना असून, उसाला योग्य दर मिळेपर्यंत संघटना आंदोलन थांबविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : पंजाबराव पाटील
विदर्भ आणि मराठवाड्यातून आजकाल केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता लढण्यास सज्ज व्हावे. संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे निर्देश करून ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही त्यांनी केला.