शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून फेकलेल्या मुलीला खासगी रुग्णालयात हलवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

सातारा : धावत्या रेल्वेतून फेकून दिलेल्या जखमी मुलीला बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या ...

सातारा : धावत्या रेल्वेतून फेकून दिलेल्या जखमी मुलीला बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या पीडित मुलीसोबत तिचे पालक आणि कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान सोमवारी मध्यरात्री घडला होता. यामध्ये मुलगी जखमी झाली होती. या घृणास्पद प्रकारानंतर रेल्वे पोलीस व पुणे पोलिसांनी काही तासातच संशयितास भुसावळ येथून अटक केली. प्रभू मल्लाप्पा उपहार (वय ३३, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सैन्यदलात झांसी येथे कार्यरत आहे.

दरम्यान, जखमी पीडित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक दिवस तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. मात्र तिच्या पालकांनी त्या मुलीला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी मुलीला खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या मुलीची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.