वडिलांच्या तेराव्याला कलमी आंब्याच्या झाडाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST2021-03-27T04:40:29+5:302021-03-27T04:40:29+5:30

वाठार स्टेशन : बिचुकलेच्या माजी सरपंच साधना पवार यांचे सासरे व कोरेगाव तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, ...

Gift of grafted mango tree to father's thirteenth | वडिलांच्या तेराव्याला कलमी आंब्याच्या झाडाची भेट

वडिलांच्या तेराव्याला कलमी आंब्याच्या झाडाची भेट

वाठार स्टेशन : बिचुकलेच्या माजी सरपंच साधना पवार यांचे सासरे व कोरेगाव तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, पर्यावरणप्रेमी संजय पवार यांच्या वडिलांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर या कुटुंबियांनी हिंदू धर्माप्रमाणे त्यांचे सर्व विधी पूर्ण केले. याच विधीतील तेराव्याचा दिवस शुक्रवारी होता. या दिवशी पै-पाहुण्यांना कापड किंवा भांडी देण्याची पद्धत आहे. मात्र अशी पध्दत बाजूला ठेवून निसर्ग संवर्धन ही काळाची गरज ओळखून, आलेले पाहुणे व गावातील लोकांना आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकणच्या मातीत तयार झालेली कलमी आंब्याची झाडे भेट दिली.

दिलेली झाडे जे लोक व्यवस्थित जोपासतील, त्यांना वर्षश्राध्दावेळी पुन्हा अशीच वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे देणार असल्याचे पवार कुटुंबियांनी सांगितले. बिचुकले गावच्या सामाजिक कामात तसेच जलयुक्त शिवार, वृक्षसंवर्धनात कार्य करणाऱ्या पवार कुटुंबाने आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कोरेगाव तालुक्यातील अनेक वृक्षप्रेमींनी कौतुक करत समाजातील इतरांनीही त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Gift of grafted mango tree to father's thirteenth