शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर कंग्राळकरांना अटक करा

By admin | Updated: July 23, 2014 22:40 IST

अवैध उत्खनन : सामाजिक चळवळ बदनाम केल्याप्रकरणी कार्यकर्ते संतप्त

सातारा : ‘पैसे उकळण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे,’ असा आरोप येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी केल्याने त्याविरोधातील तीव्र पडसाद बुधवारी उमटले. सामाजिक चळवळ बदनाम करण्याच्या हेतूनेच कंग्राळकरांनी हा आरोप केल्याचे म्हणत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डर कंग्राळकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शहरात राधिका रस्त्यावरील जागेत अनधिकृतरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर आनंदराव कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडली आहे. कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केले आहे. याबाबत दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युथचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गालफाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला होता. तहसीलदारांच्या या कारवाईविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले होते. या अपिलात आपण शासनाला कोणतेही देणे लागत नाही. तसेच गालफाडे व मोरे हे पैसे उकळण्यासाठी आपल्याला या प्रकरणात गोवत असल्याचे त्यांनी या अपिलात म्हटले होते. तसेच महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यावरही आक्षेप घेतला आहे. ‘राज्यघटनेने जे मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहेत. तसेच सार्वजनिक हित लक्षात घेऊन न्याय मागण्याचा अधिकारही दिला आहे. साताऱ्यात सुरू केलेले उपोषण त्याचाच एक भाग आहे. मात्र, पैशासाठी हे आंदोलन सुरू केल्याचा आरोप करून आंदोलकांना बदनाम करण्याचा डाव धनदांडग्यांनी आखला आहे. मुळात शासनाचा महसूल बुडवून त्यांनी सुरु केलेल्या ‘उद्योगांची’ जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणीही रिपाइं कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बिल्डर कंग्राळकरांनी मी त्यांना पैसे मागितल्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माझ्यावर आरोप केल्याबाबत जाहीर माफी मागावी. माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. त्यांनी कुठे, काहीही बेकायदा कृत्य केले असेल तर त्याविरोधात शासकीय, प्रशासकीय आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे. जे बेकायदा कृत्य करतात, त्यांच्या विरोधात मी नेहमी आवाज उठवित आलो असून उठवतच राहणार आहे. मात्र, अशावेळी पैसे उकळण्यासाठी आम्ही कारवाई करायला लावली, हा आरोप सहन होणारा नाही. त्यामुळे मी व्यथित झालो आहे.- सुशांत मोरे, अध्यक्ष, दिशा विकास मंचप्रत्येकवेळी आरपीआयचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा जनतेच्या जीवाभावाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतो. कंग्राळकरांसारख्या भांडवलदार, राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असलेले बिल्डरांनी कार्यकर्त्यांवर केलेला आरोप हे पूर्णपणे चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. हा आरोप म्हणजे आमच्या पक्षाच्या अस्मितेवरच घाला आहे, असे आम्ही समजतो. सामाजिक न्यायासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या माध्यमातून न्याय मागायचा नाही तर काय या धडदांडग्यांच्या कुशीत जाऊन बसायचे? चळवळीला बदनाम करणाऱ्या कंग्राळकरांना अटक झाली पाहिजे.- शरद गायकवाड,अध्यक्ष, आरपीआय कामगार संघटना किशोर गालफाडे यांनी गेल्या नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले. त्याला मनसेसह इतर काही पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदालनामुळेच बिल्डर कंग्राळकरांना तहसीलदारांनी साडेबावीस लाखांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. अवैध मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे चाप बसेल, अशी आम्हा कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्तेच पैसे घेतात, असा केलेला आरोप पूर्ण खोटा असून, कंग्राळकरांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे यातून स्पष्ट होते. - राहुल पवार,शहराध्यक्ष, मनसेबिल्डर कंग्राळकरांनी संबंधित जागेत केलेले उत्खनन आणि प्रशासनाने केलेला पंचनामा यात मोठी तफावत आहे. पंचनाम्यात नोंद केलेल्या रकमेपेक्षा जास्त दंड त्यांना व्हायला हवा होता. आमच्या कार्यकर्त्यांच्या माहितीप्रमाणे तब्बल एक कोटी शासनाच्या तिजोरीत दंडाच्या रूपाने जमा व्हायला हवे होते. त्यांच्या सर्वच प्रोजेक्टची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.- अशोक गायकवाड,जिल्हाध्यक्ष, आरपीआय