शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयासमोरच पाण्याची गळती

By admin | Updated: January 14, 2015 00:35 IST

स्थानिक त्रस्त : अधिकारी वर्गानेही घेतली गांधारीची भूमिका

सातारा : येथील जिल्हा परिषद ते सदर बझार या परिसरात जागोजागी जलवाहिनीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे या परिसरातच विविध शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांची निवास्थाने आहेत तरी सुध्दा या गळतीकडे पाहून देखील अधिकारी वर्गांनी गांधारीची भूमिका घेतली आहे की काय असा पश्नच नागरिकांना पडला आहे.
जिल्हा परिषदेच्या चौकातच दिवसभर पाणी वाहत असते हे पाणी जिल्हा परिषद पासून शासकीय विश्रांतीगृहापर्यंत पोहोचले असून गळती लागलेल्या वाहत्या पाण्यामुळे आता रस्ताही उखडला असून रस्त्यावर मोठी डबकी पडली आहेत. तर अनेक ठिकाणी दलदल माजली आहे. जिल्हा परिषद ते सदरबझार येथील समाज कल्याण कार्यालयापर्यंत ही गळती जागोजागी पाहायला मिळते. याविषयी तक्रारी करूनदेखील कोणतीच दखल घेत नाहीत. त्यामुळे आता तक्रारदारही या गळतीकडे दुर्लक्ष करीत आहे.
दरम्यान, येथील शासकीय कार्यालय व निवास स्थानकाच्या मार्गावरच ही अवस्था आहे. तर दुसरीकडे सातारा विश्रामगृह याच मार्गावर आहे. त्यानुसार सातारा शहर व जिल्ह्याचे प्रशासनाच्या दारीच ही अवस्था असल्याने जिल्ह्याचे चित्र कसे असेल अशी कल्पना काहीजण करीत आहेत. शासकीय विश्रामधाममध्ये सतत आमदार, खासदार, मंत्री व वरिष्ठ अधिकारी येतात. एकीकडे शासनाने पाणी वाचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रबोधन करायचे, दुष्काळी भागासाठी पाणी देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून आराखडा तयार करायचा, दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरण्यासाठी आवाहन करायचे आणि पाच ठिकाणी पाणी गळती लागून हजारो लिटर पाणी वाचा जात असताना पाण्याच्या डबक्यातून वाहने चालवीत जगाला पाण्याची किंमत सांगणाऱ्या या नेतेमंडळी व अधिकाऱ्यांना या गळत्या कधी काढणार, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)

मागील दोन महिन्यापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. जिल्हा परिषद चौक ते सदरबझार येथील तारळकर घरापर्यंत रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत पाण्यासाठी फिरावे लागते. शासनाने गळती काढली तर हजारो लोकांना याचा लाभ होईल.
-गणेश भोसले


रस्ता उखडला
शासकीय विश्रामगृहात नेहमीच मंत्री, अधिकाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता नेहमीच चकाचक असतो; परंतु सध्या लागलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळे जागोजागी रस्ता उखडला आहे. तर अनेक ठिकाणी गळती लागलेले पाणी या उखडलेल्या रस्त्यात साचून डबकी झाली आहेत.