शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

टोलवर ‘फुकट’ची हवा; कारवर चक्क अंबरदिवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोलचं भूत मानगुटीवर बसतं. आणि हे भूत ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोलचं भूत मानगुटीवर बसतं. आणि हे भूत उतरविण्यासाठी काही वाहनधारक ना-ना क्लृप्त्या करतात; पण टोल चुकविण्यासाठी केलेली बोगसगिरी सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकवित आहे. बोगस अंबरदिवे लावून आणि बनावट ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्यांना आता थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

कऱ्हाड तालुक्यातील तासवडे टोलनाका व्यवस्थापनाने गतवर्षभरात शेकडो बोगस ओळखपत्रे आणि अंबरदिवे जप्त केले आहेत. शासकीय वाहने, कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना टोल आकारला जात नाही. त्यामुळे काही वाहनधारक याचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न करतात. खासगी वाहनावर अंबरदिवा लावून संबंधित वाहन शासकीय असल्याचे अथवा वाहनात महत्त्वाची व्यक्ती असल्याचे भासविण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतो. तसेच काही जण शासकीय खात्याची बोगस ओळखपत्र तयार करून टोलनाक्यावर ती दाखवित मुभा मिळविण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा ही बोगसगिरी खपून जाते. मात्र, काही वेळा अशा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. तासवडे टोलनाक्यावर अशी बोगसगिरी करणाऱ्या वाहनधारकांकडील शेकडो बनावट ओळखपत्रे आणि अंबरदिवे हस्तगत करण्यात आले आहेत. काही जणांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

- चौकट

काय होते कारवाई..?

खासगी वाहनावर पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, पोलाईट यांसारखे कोणतेही शब्द, अक्षरे, अंक, चित्र विनापरवाना लावणे कायद्याने गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यासाठी कलम १३४ (६), १७७/१७९ या कलमान्वये २०० ते १ हजार रुपये आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

- चौकट

‘पोलीस’ ओळखपत्र जास्त!

टोल चुकविण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय खात्यांमध्ये कर्मचारी, अधिकारी असल्याचे सांगून तशी बोगस ओळखपत्र दाखविली जातात. आजअखेर तासवडेच्या टोलनाका व्यवस्थापन आणि पोलिसांनी जप्त केलेल्या ओळखपत्रांमध्ये बोगस पोलिसांच्या ओळखपत्रांची संख्या जास्त आहे.

- चौकट (फोटो : १६केआरडी०२)

किती भरावा लागतो टोल?

१) कार/जीप : ७५ रु.

२) टेम्पो, मिनीबस : १३५ रु.

३) बस, ट्रक : २६५ रु.

- चौकट

सरकार, आमदार अन् ‘व्हीआयपी’ चिन्ह

टोल चुकविण्याच्या उद्देशाने काही जण खासगी वाहनावर पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, आमदार, खासदार, महापौर असे लिहितात अथवा ‘व्हीआयपी सिम्बॉल’चा (चिन्ह) वापर करून ते बोगसगिरी करीत टोल टाळण्याचा प्रयत्न करतात.

- चौकट

७५ रुपयांसाठी ‘ती’ कार सडली!

तासवडे टोलनाक्यावर काही महिन्यांपूर्वी एका वाहनधारकाने बोगस ओळखपत्र दाखविले होते. त्याची बोगसगिरी उघड झाल्यानंतर तळबीड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची लाखो रुपयांची अलिशान कारही जप्त करण्यात आली. अनेक महिने ती कार पोलीस ठाण्याच्या आवारात अक्षरश: सडत पडली होती.

फोटो : १६केआरडी०१

कॅप्शन : तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर व्यवस्थापन आणि पोलिसांनी शेकडो बनावट ओळखपत्रे आणि अंबरदिवे जप्त केले आहेत.

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कऱ्हाड येथे असलेल्या टोलनाक्यावर वाहनधारकांना टोल भरावा लागतो.