शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

By दीपक देशमुख | Updated: July 31, 2025 14:00 IST

तारळी नदीवर २० वर्षांपासून नाही पुलाचा पत्ता : गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची वानवा

दीपक देशमुखसातारा : सातारा तालुक्याच्या टोकावरील जगमीन गावातून तारळी नदी वाहते. नदीवर आजतागायत पूल बांधलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी नाइलाजाने उपाय शोधला. त्यानुसार पंधरा-वीस वर्षांपासून वीतभर खांबावरून ग्रामस्थ व शाळकरी मुले धोकादायकरीत्या नदी पार करताहेत. सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री व चार कॅबिनेट मंत्री असतानाही जगमीनचे ग्रामस्थ धोकादायक जीणं जगत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून पुढे आले.जगमीन हे डोंगर पठारावर वसलेलं साडेतीनशे लोकवस्तीचं गाव. निसर्गाने भरभरून दान दिलं, असलं तरी डोंगराळ भागाचं खडतर जीणंदेखील येथील लोकांच्या नशिबी आहे, हे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचा हात गावात पोहोचत नाही. गावांमध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांचा थांगपत्ता नाही. सततच्या पावसामुळे शेतीही करता येत नाही.त्यामुळे भूमिपुत्र पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात राहत आहेत. त्यांच्या घरातील महिला, मुले, वृद्ध गावातच राहत आहेत. मुख्य रस्त्यांपासून दूर गाव असल्यामुळे साधी काडीपेटी घ्यायची असेल तरी आठ-दहा किलोमीटर चाळकेवाडीत जावे लागते. त्यामुळेच प्रशासनाच्या दृष्टीने या दुर्गम गावातील नदीवर पूल बनण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मालदेव येथेही पुलाची आवश्यकता..सातारा-ठोसेघर मार्गावर उजवीकडे मालदेव व जगमीनकडे जाण्यासाठी साधा रस्ता आहे. मालदेव येथे ओढ्यानजीक रस्ता पूर्ण उखडला आहे. या ओढ्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे पूल उभारण्याची आवश्यकता आहे.

तारळी नदी ओलांडून उपचार..जगमीन गावातून तारळी नदी वाहत गेल्यामुळे अलीकडचे आणि पलीकडचे जगमीन अशा दोन वस्त्या झाल्या आहेत. या वस्त्या चाळकेवाडी ग्रामपंचायतीत येत असल्याने तिथेच आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणाला उपचाराची गरज भासली तर आठ किलोमीटरचा हेलपाटा नक्की. त्यातच नदी पलीकडील जगमीनचे रहिवासी असले तर लोखंडी खांबावरून रात्रीत नदी पार करण्याचे धाडस करावे लागते. 

शाळा अलीकडे, अंगणवाडी पलीकडेगावात जिल्हा परिषद शाळा नदीच्या अलीकडे आहे तर पलीकडील बाजूस अंगणवाडी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा पुलावरून चालतानाच्या व्हायरल व्हिडिओवरून वातावरण तापले आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतच अंगणवाडीच्या मुलांना बसविल्याचे दिसून आले. तथापि, ग्रामस्थांना नदी पार करण्याचा हाच काय तो खुश्कीचा; पण धोकादायक मार्ग आहे.

तारळी नदीवरील पुलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुलाला मंजुरी दिली होती. परंतु नवीन सरकार आल्यानंतर मंजुरी रद्द झाली. तरीही पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून निवेदन दिले आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात या कामाचा समावेश केल्याने पूल लवकर होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. - जगन्नाथ माने, सरपंच, जगमीन 

जगमीन गावातील दोन्हीकडच्या लाेकांना येण्या-जाण्यासाठी याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट असते. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर पूर्वी एकदा हा लोखंडी खांब वाहून जाण्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा दुर्घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार आहे का? - कोंडिबा डोईफोडे, ग्रामस्थ, जगमीन