शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजारांची लाच घेताना वनरक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाल, (ता. कऱ्हाड) येथे करण्यात आली.

राहुल बजरंग रणदिवे (वय ३४, रा. कोयना सोसायटी, विलासपूर, गोडोली सातारा) असे लाच घेताना पकडलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पन्नास वर्षीय संबंधित तक्रारदार हे पाल, (ता. कऱ्हाड) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी चोरे बीटचा वनरक्षक राहुल रणदिवे याने त्यांच्याकडे सुरुवातीला २५ हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने साताऱ्यातील लाचलुचपत कार्यालयात येऊन रितसर लेखी तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रणदिवे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी पाल येथे अधिकाऱ्यांनी सापळा लावला असता रणदिवे हा पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकला.

पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक ताटे, खरात आणि येवले यांनी ही कारवाई केली.