शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे पालन करा : देशमुख

By admin | Updated: September 22, 2014 00:47 IST

सातारा : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा

सातारा : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी केल्या आहेत.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेची तयारी आणि कायदा व सुव्यवस्था याचा आढावा त्यांनी रात्री उशिरा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनंदा गायकवाड त्याचबरोबर सर्व अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करून विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले, ‘आवश्यकतेनुसार आचारसंहिता कक्ष, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करावीत. आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास कोणताही मुलाहिजा न ठेवता तत्काळ कारवाई करावी.’निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नि:पक्षपणे व पारदर्शकपणे कार्यवाही करावी. निवडणूका निर्भयपणे आणि शांततत पार पाडाव्यात. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांनी चांगला समन्वय ठेवून सदैव दक्ष आणि सतर्क रहावे, असेही देशमुख म्हणाले.निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यात कायदा व सुव्यसथेला बाधा निर्माण होईल अशी मतदान केंद्रे निश्चित करून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच व्हिडीओ चित्रीकरणही करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश विभागीय आयुक्त देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)