बैलगाड्या शर्यतीप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:34+5:302021-01-08T06:07:34+5:30

फलटण : बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही भाडळी खुर्द येथे शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ...

Five charged in bullock cart race | बैलगाड्या शर्यतीप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

बैलगाड्या शर्यतीप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

फलटण : बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही भाडळी खुर्द येथे शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. ३) भाडळी खुर्द येथे सकाळी नऊच्या सुमारास चोरमले वस्तीनजीक प्रशांत सोनवलकर यांच्या रानात बैलांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर केल्या. याप्रकरणी सुभेदार तथा पिंटू जमादार डुबल, अमोल विठ्ठल कोळपे (दोघेही रा. भाडळी खुर्द), विकास चांगण (रा. सासकल), सचिन गुंजवटे (रा. झिरपवाडी), प्रणय नवनाथ भंडलकर तथा गुरव (रा. तिरकवाडी ता. फलटण) यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जमावबंदीचे उल्लंघन, प्राण्यांना निर्दयीपणे व क्रुरपणे वागवण्यास प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत भाडळी खुर्दचे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार एस. व्ही. खाडे तपास करत आहेत.

Web Title: Five charged in bullock cart race