शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे दारू वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररीत्या बिअर वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यावर शिरवळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दुचाकी, ३६ बिअरच्या ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररीत्या बिअर वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यावर शिरवळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दुचाकी, ३६ बिअरच्या बाटल्यांसह २१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोहित सुभाष सुर्वे (वय २६, रा. सोनाली गार्डन हॉटेल, दत्तनगर, शिरवळ ता. खंडाळा) असे बिअर वाहतूकदाराचे नाव आहे.

शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ, ता. खंडाळा येथील पंढरपूर फाटा या ठिकाणी देशी-विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती शिरवळ पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंढरपूर फाटा येथील एका पुलाजवळ सापळा रचला असता त्या ठिकाणी विना नंबरप्लेट असणारी दुचाकी शिरवळ बाजूकडून येताना दिसली. पोलिसांनी थांबवली असता दुचाकीचालक रोहित सुर्वे हा बेकायदेशीररीत्या बिअरची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. या घटनेची फिर्याद जितेंद्र शिंदे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार रवींद्र कदम हे करीत आहे.