शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवरील आरक्षणाविरोधात मलकापुरात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST

पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर ...

पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार अरुण पवार, आत्माराम पवार, सीताराम पवार, जगन्नाथ पवार, संभाजी पवार, उमाकांत पवार यांच्या २१ एकर १५ गुंठे जमिनीवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व गार्डन, लायब्ररी व शेती, रस्ता, हायस्कूल व प्लेग्राउंड अशी विविध प्रकारची आरक्षणे जाणून-बुजून टाकली आहेत. वेळोवेळी आरक्षित जमिनीपैकी काही जमिनीची मागणी केली. मात्र, विविध मार्गांचा अवलंब करून सत्ताधारी आमची जमीन आमच्याकडून कधी काढून घेतील, या चिंतेने आमची झोप उडालेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह हस्तकांच्या दहशतीखाली आम्ही राहतो. या बिकट परिस्थितीत आम्हावर गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शेतीचा मोबदला द्या किंवा आरक्षण काढून शेतीतरी परत द्या, अशी मागणी पवार कुटुंबाने केली.

पवार कुटुंबीयांनी महिला, मुली व लहान मुलांसह पालिकेसमोरच सोमवारी ठिय्या मारला होता. उपोषणास भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेवक भास्करराव ऊर्फ आबा सोळवंडे, भारत जंत्रे, अण्णा काशीद, दिनेश रैनाक, नितीन काशीद, अजित देसाई, दत्तात्रय शिंगण, अरुण पवार, अरुणादेवी पाटील, सारिका गावडे, संजय पवार, विद्यादेवी शिंदे, अ‍ॅड. दीपक थोरात, हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे, सुरेश खिलारे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

- चौकट

आठ तासांनंतर उपोषण सोडले

पवार कुटुंबीय पालिकेसमोर सोमवारी सकाळी उपोषणास बसले होते. सायंकाळी ५ वाजता डॉ. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

- चौकट

मुख्याधिकारी मर्ढेकर यांच्याशी चर्चा

उपोषणकर्त्यांनी मागणीचे पत्र मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांना दिले. त्यावेळी मर्ढेकर यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. तुम्ही सहाजणांच्या शेतीसह आरक्षणाबाबत सविस्तर माहिती द्या. ती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवून जो निर्णय होईल तो नगरविकास विभागाकडे पाठवतो, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

फोटो : ०८केआरडी०६

कॅप्शन : शेतीवरील आरक्षणाविरोधात सोमवारी मलकापूर पालिकेसमोर पवार कुुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन केले. (छाया : माणिक डोंगरे)