शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ...

खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, कांदा, आदी पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. या आधी वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. धुक्यामुळे गव्हावर तांबेरा, हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर कांद्यावर करपा व टाका रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा औषधे फवारणीकरिता कंबर कसावी लागणार आहे. थंडीला सुरुवात झाल्यामुळे रब्बी पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. रब्बी पिकाच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या; परंतु अचानक पावसाळी वातावरण व पडलेला पाऊस या आगाप असलेल्या ज्वारी पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक जोमात येऊन सुद्धा या वातावरणामुळे कोमात जाण्याची भीती शेतकऱ्याला लागली असून, या पिकांना वाचविण्यासाठी आता कृषीच्या दुकानात कीटकनाशक औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याची गडबड सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकऱ्याचे तोंडचे पाणी पळविले आहे, तर रब्बीच्या आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

०६खटाव पीक

फोटो : अवकाळी पावसामुळे खटावमधील बहुतांश शेतातील ज्वारी पिके आडवी झाल्याने रब्बी ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.