शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

तोड होणाऱ्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा

By admin | Updated: December 1, 2015 00:12 IST

शिवेंद्रसिंहराजे : कोंडवे येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन

सातारा : चालूवर्षी योग्य वेळी व योग्य प्रमाणात पर्जन्यमान न झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून, या अवर्षण परिस्थितीत चालू गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये ऊस तुटून गेल्यानंतर पाण्याअभावी इतर कोणत्याही पिकाचे नियोजन शक्य नसल्यामळे ऊसतोडणी झाल्यावर फक्त ऊस पिकाचा जास्तीत जास्त खोडवा ठेवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याने तोड होणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा, असे आवाहन अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व संचालक मंडळाच्या आदेशानुसार अवर्षण परिस्थितीत ऊसपीक जोपासना व खोडवा पीक व्यवस्थापन या विषयावर कोंडवे येथे साखर कारखान्यामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिवेद्रसिंहराजे म्हणाले, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी तुटणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा तसेच पाचट आच्छादन करावे. खोडव्याचे ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार करावे. पुढील वर्षीच्या लागणीकरिता पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ ते १० गुंठ्याचे बियाणे तयार करावेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून साखर कारखान्याचे साह्णाने ठिबक सिंचन करावे असे आवाहनही त्यांनी केली. यावेळी फिनोलेक्स कंपनीचे डे. मॅनेजर व अ‍ॅग्रानॉमिस्ट विठ्ठल गोरे यांनी ऊसपीक लागवड व उसासाठी ठिबक सिंचन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कारखान्याच्या ऊसविकास विभागातर्फे ऊस खोडवा व्यवस्थापन, कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन, पाण्याची सोय नसताना दुष्काळातील खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. (प्रतिनिधी)