शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीही वाचू शकतो सहज सातबारा

By admin | Updated: November 2, 2015 23:56 IST

सातबारावर स्वत:लाच काही प्रश्न विचारून पाहावेत

सातबाराचा उतारा हा शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुखी करणे, तसाच तो दु:खी करण्यासही कारणीभूत होऊ शकतो. कारण या उताऱ्यावरील नोंदी जर वेळोवळी अचूक करून ठेवण्याची दक्षता शेतकऱ्यांने घेतली नाही, तर कोर्ट खटले सुरू होतात. पर्यायाने झालेला दोष अद्ययावत करून घेण्यात शेतकरी पूर्ण बरबादही होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम व योजना राबवत आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यास सातबारा उतारा अल्प किमतीत देणे, घरपोच देणे, खाते पुस्तिका देणे, अशा एक ना अनेक योजना राबविल्या गेल्या जात आहेत. मुळात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत की, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा सातबारा उतारा अगदी समक्ष त्याचे हातात दिला तरी त्यावरील नोंदी त्याला कळतात का? त्याचा त्याने अभ्यास केला आहे का? ता समजा अडाणी असला अगर त्याला समजत नसल्यास त्याने माहीतगार व्यक्तीकडून अगर कायदे सल्लागारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे शेतकऱ्यास सातबारा उतारांवरील नोंदी कोणत्या आहेत व त्या योग्य आहेत का याची पूर्ण माहिती होणे जरूर आहे. सातबारा च्या उताऱ्यावरील नोंदी शेतकऱ्याने जर बारकाईने वाचल्या व वाचत असतानाच जर स्वत:लाच पुढील प्रश्न विचारले तर उताऱ्यावरील नोंदी अचूक आहेत का, दुरुस्त करून घेणे जरुरीचे आहे याचा बोध होईल. सुशिक्षित शेतकऱ्याला तर स्वत:लाच योग्य ते उत्तर मिळेल व जर शेतकरी अडाणी असेल तर मात्र तो कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तीस, मित्र, माहितीची व्यक्ती, कायदे सल्लागार यांनाही हे प्रश्न विचारून त्याची खात्री करून घेऊ शकतो.सुशिक्षित व्यक्तीस विचारून जर एखाद्या नोंदीबद्दलचे उत्तर ‘झालेली अगर असलेली नोंद योग्य नाही’ असे उत्तर मिळाले, तर लगेचच कायदेशीर सल्ला घ्यावयास पाहिजे. त्याचबरोबर महसूल विभागाच्या सक्षम प्राधिकरणाकडे संपर्क साधून दाद मागावयास पाहिजे. अशा प्रकारे कार्यवाही वेळीच झाली नाही तर पुढे भविष्यात फारच गुंतागुंत वाढते व शेतकरी नाहक नाडला जातो. प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी दिवाळी झाल्यावर व गावची यात्रा झाल्यावर आपल्या सर्व जमिनीचे सातबारा उतारे प्राप्त करून घ्यावेत. शेतकऱ्यांच्या लक्षात तारखा अगर महिना राहण्याची शक्यता कमी असते, म्हणून ठळक वैशिष्ट्याचे हे दोन उदाहरणे दिली आहेत. कारण यावेळी त्या वर्षाची खरीप व रब्बी पिकांची पीक पाहणी झालेली असते. सातबारा उतारे प्राप्त केल्यावर ते एका मजबूत फाईल कव्हरमध्ये सालानुक्रमानुसार ठेवावेत. अन्य काही ठिकाणी ते गुदरण्याचा प्रसंग उद्भवला तर त्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत द्यावी. दुसरा उतारा प्राप्त करून ठेवावा.सातबारावर स्वत:लाच काही प्रश्न विचारून पाहावेतमाझ्या जमिनीचा किंवा भूखंडाचा सर्व्हे नंबर अगर गट नंबर अगर भूखंड नंबर बरोबर आहे का?सातबाराच्या उतारावर डाव्या बाजूस क्षेत्राचा, आकाराचा तपशील नमूद करण्यात आला आहे, तो बरोबर आहे का, मागील सातबाराच्या नोंदीत व आताच्या नोंदीत बदल झाला आहे का? झाला असल्यास योग्य आहे का?उताऱ्यामधील रकान्यात (चौकटीत) मालकाचे, कब्जेदाराचे नमूद असलेले नाव किंवा नावे योग्य आहेत का? योग्य नसल्यास काय चुकले आहे का? कारण या रकान्यातील नोंदी फारच महत्त्वाच्या असतात.उताराच्या उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात ‘इतर हक्काच्या’ म्हणजे बिनशेती, कर्ज, इतर हक्कदार, कूळ, विहीर बोजे आदींच्या नोंदी आहेत का? असल्यास त्या योग्य आहेत का?उताऱ्याचा खालील भाग हा नमुना १२ म्हणून आहे. त्यात त्या वर्षात केलेली पिके, त्याखालील क्षेत्र, वहिवाट कोणाची आहे याच्या नोंदी आहेत का? व केलेल्या नोंदी योग्य आहेत का?

सुधाकर करपे