शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून वाचले आठ प्राण

By admin | Updated: August 30, 2015 21:51 IST

वाईत अपघात : रसायनने भरलेल्या टँकरची जीपला धडक; तिघांची प्रकृती गंभीर

वाई : वाई-मांढरदेव रस्त्यावरील चांदणी चौकात रसायनने भरलेल्या टँकरने वडाप जीपला जोरदार धडक दिली. या अपघातात जीपमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडला.घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई-मांढरदेव रस्त्यावर औद्योगिक वसाहत आहे. रविवरी दुपारी मुंबईहून (गोवंडी) आलेला रसायनने भरलेला टॅँकर (एमएमच ०४ एफपी १७७६) हा औद्योगिक वसाहतीतील रसायन कंपनीकडे निघाला होता. दरम्यान, चांदणी चौकात आल्यानंतर धावडी येथून वाईकडे येणाऱ्या वडाप जीपला (एमएच ११ एफ १७०८) टॅँकरने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, वडाप जीप तीन-चार पलट्या खाऊन रस्त्याकडेला पलटी झाली.या अपघातात जीपमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींमध्ये अभिजित गाढवे (वय २९), अक्षय उंबरकर(१९) व मंदा दशरथ उंबरकर (३७) यांचा समावेश आहे़ तर संग्राम सपकाळ, विजया मांढरे, सुमन पोतेकर, गनिजा पोतेकर, हृषीकेश नलावडे हे किरकोळ जखमी झाले आहेत़ अपघातात बोपर्डी, धावडी, पिराचीवाडी, सुलतानपूर या गावांतील नागरिकांचा समावेश आहे़ किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आले़ अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ टॅँकरचा चालक मतीन खान (वय, ४० रा. शिवाजीनगर, गोंवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी) चांदणी चौक बनला मृत्यूचा सापळाएमआयडीसी येथील चांदणी चौकात अपघात होणे ही नित्याची बाब बनली असून, परिसरातील व्यावसायिक, कामगार व ग्रामस्थांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे़ चांदणी चौकात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत़ बांधकाम विभागाने त्वरित या ठिाकाणी गतिरोधक बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धावडीचे माजी सरपंच सतीश मांढरे यांनी दिला आहे.