शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना लॉटरी!

By admin | Updated: January 11, 2017 23:38 IST

जिल्हा बँक कर्मचारी भरती : ३७६ जणांना मिळणार रोजगाराची संधी ; २४६ लेखनिक, १३० शिपाई पदे

सातारा : ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात जिल्हा बँक भरतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत २४६ लेखनिक व १३० शिपाई अशा एकूण ३७६ कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून, या गोड बातमीमुळे अनेक वर्षे नेत्यांच्या पुढे-मागे करत फिरणाऱ्यांच्या आशेला उधाण आलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निर्विवाद वर्चस्व ही राष्ट्रवादी पक्षाची जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील परंपरागत घराण्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकपद मिळवून आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवलेले आहे. ‘सैन्य पोटावर चालते’ ही म्हण आहे, तीच राजकारणातही लागू पडते. साहजिकच निवडणुका लढविताना कार्यकर्त्यांची फौज महत्त्वाची; मात्र त्याच्या पोटाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारीही नेत्यांवर येऊन पडते. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपल्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना अथवा त्यांच्या जवळच्या लोकांना रोजगाराची संधी देऊन कार्यकर्त्याला ‘बळ’ देण्यासाठी नेत्यांची नेहमीच धडपड असते. मात्र, त्यासाठी अनेकदा काही कार्यकर्ते नाराज होतात, हे देखील खरे आहे. ग्रामपंचायत, सेवा सोसायट्या, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा यांच्या निवडणुका एकमेकांत गुंतलेल्या असतात. साहजिकच या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे मायक्रो प्लानिंग कायमच सुरू असते. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता लागून कुठल्याही वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.या पार्श्वभूमीवरच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीला सहकार आयुक्तांची मंजुरी मिळालेली आहे. ही गोष्ट राष्ट्रवादीसाठी निश्चितच फायद्याची ठरू शकणारी आहे. सहकार नियमांचे पालन करूनच ही भरती होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यावर पहिल्यापासून जसा राजकीय प्रभाव राहिला आहे, तोच या भरतीतही राहणार, हे अलिखित सत्य आहे. जिल्हा बँकेत २१ संचालक आहेत. प्रत्येक संचालकांना सरासरी १४ कर्मचाऱ्यांचा कोटा देणे शक्य असले तरी बँकेत ज्यांचा प्रभाव जास्त आहे, तीच मंडळी आपला अधिकार राखून ठेवून दबाव टाकू शकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) वाईकरांना मोठी संधी...वाई विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मणराव पाटील, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे हे चार संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रतिनिधीत्व करत आहेत, त्यामुळे वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांतील जिल्हा बँकेत नोकरी मिळण्याची संधी मोठी आहे.उदयनराजे, जयकुमार यांच्या भूमिकेकडे लक्षजिल्हा बँकेतील संचालकाचे अधिकार मिळविण्यासाठी उदयनराजे भोसले व जयकुमार गोरे या दोघांनी आक्रमक पावले उचलली होती. आता या भरतीच्या निमित्तानेही हे दोन संचालक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.