शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

मृत मासे टाकून जलप्रदूषणाचा निषेध

By admin | Updated: May 19, 2015 00:23 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय : इस्लामपूरच्या मानवाधिकार संघटनेचे तीव्र आंदोलन

सातारा : भुर्इंज येथील किसन वीर व रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी दूषित पाणी कृष्णा नदीपात्रात सोडल्याने असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. तरीही दोन्ही कारखान्यांवर नाममात्र कारवाई झाली आहे. याचा निषेध करीत इस्लामपूर येथील इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फेडरेशनच्या वतीने सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात मृत मासे टाकून आंदोलन केले.संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याने सोडलेल्या दूषित पाण्यामुळे लिंब व कृष्णा कारखान्याने सोडलेल्या दूषित पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर, बहे, खरातवाडी, फार्णेवाडी, बोरगाव, बनेवाडी, ताकारी, तुपारी भागांतील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. नदीतील पाण्याचा रंग बदलला असून, पाण्याला दुर्गंधी येत आहे. नदीच्या दोन्ही काठाला मृत माशांचा थर साचला आहे. नदीकाठच्या गावांतील लोकांना पंधरा दिवसांपासून हेच पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ७, ८, ९ मे रोजी अनुक्रमे सांगली, कऱ्हाड व रेठरे बुद्रुक येथे आंदोलन केले होते. त्यावेळी कारखाना व्यवस्थापनाने दूषित पाण्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, शनिवारी (दि. १६) प्रशासनाने कृष्णा व किसन वीर कारखान्याला पाणी दूषित केल्याप्रकरणी दोषी ठरवत कारवाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. नदीकाठच्या दोन्ही कारखान्यांकडून पाच लाख रुपये अनामत म्हणून जप्त करावेत, अन्यथा गुरुवारी (दि. २१) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)पोतंभर मासे, दुर्गंधी, स्वच्छता अन् रूमफे्रशनर ...येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात दुपारी अडीचच्या सुमारास दहा ते बाराजण आले होते. त्यांनी पोत्यात मृत मासे भरून आणलेले. आल्या-आल्या त्यांनी कार्यालयात सर्वत्र मासे टाकण्यास सुरुवात केली. ‘कारवाई करत नसणाऱ्या मंडळाचा निषेध असो, धिक्कार असो,’ अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर सर्वांनी एक-एक मासा प्रत्येक टेबलावर ठेवला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत सर्वांनी हा प्रकार केला. मासे टाकल्यानंतर सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांनी त्वरित मासे भरून ठेवले. संबंधित वाहनांना बोलावून घेऊन त्यामध्ये मासे भरले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पाणी मारून कार्यालयातील खालील सर्व जागा साफ केली. वास जावा म्हणून रूमफ्रेशनरही मारण्यात आला.