शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील रुसवा संपेना

By admin | Updated: July 24, 2014 22:09 IST

बहुतांशी भाग कोरडाच : माण, खंडाळ्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा, फलटणलाही तुरळक

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असताना दुष्काळी भागातील पावसाचा रुसवा अद्याप संपलेला नाही. माण आणि खंडाळा तालुक्यांत आतापर्यंत फक्त ८७ मिमी इतकाच पाऊस झालेला आहे. फलटण तालुक्यात तर तुरळक पाऊस पडत असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तरच खरीप हंगामाच्या आशा आहेत. दहिवडी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने धुवाँधार हजेरी लावलेली असताना दुष्काळी माण तालुक्यात गेल्या चोवीस तासांमध्ये अवघ्या सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजअखेर केवळ सरासरी ८७ मिमी पाऊस झाला. त्यामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे.माणमधील चोवीस तासांतील पावसाची आकडेवारी कंसात एकूण दहिवडी ८ (७३), मार्डी ५ (१०५), मलवडी ५ (८८) कुकुडवाड २ (२७), म्हसवड ९८ (१३१), गोंदवले १२ (९४), शिंगणापूर - १० (१०२). यामध्ये सर्वात कमी पाऊस कुकुडवाड सर्कलमध्ये तर सर्वात जास्त म्हसवडमध्ये झाला आहे. गतवर्षी परतीच्या मान्सूनने हजेरी लावल्याने दुष्काळ हटला होता. या जेमतेमच्या पावसावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके हाती घेतली होती. यावर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला तर जुलैचा पंधरवडा उलटून गेला असताना माण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. गतवर्षीच्या पावसाने आंधळी धरण ब्रिटिशकालीन राणंद तलावात पाणी साठले होते; मात्र या पाणीसाठ्यामधील पाणी तळ गाठू लागले आहेत. खरीप हंगामात पाऊस झाल्यास धूळ वाफेवर झालेली पेरणी यशस्वी होऊ शकते. माणमधील शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पश्चिम भागातील नद्यांना पाणी वाढू लागले असताना माणमधील माणगंगा नदी अजून कोरडी आहे. माणमध्ये पृथ्वी साखळी बंधारे मोठ्या प्रमाणात बांधून झाले असताना हे बंधारेही अजूनही कोरडे आहेत. पृथ्वी साखळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ओढे सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले असून, पावसाने हजेरी लावल्यास बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले जाणार आहे. माण तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासले आहे. तालुक्यातील चारा संपुष्टात आला आहे. यामुळे पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. या पशुपालकांना शेजारच्या तालुक्यातून ऊस खरेदी करून पशुधन वाचवावे लागत आहे. चारानिर्मितीसाठी दमदार पावसाची गरज आहे. - अनिल जाधव, दहिवडी