शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दोन मंडळांची डॉल्बीमुक्ती शपथ

By admin | Updated: August 30, 2015 00:13 IST

प्रदुषणाला रामराम : म्हसवड येथील शांतता कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

म्हसवड : ‘डॉल्बी’च्या दुष्परिणामांबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी डॉल्बी हद्दपार केली. अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. तर अनेक मंडळे व गावे डॉल्बीमुक्तीच्या वाटेवर आहेत. म्हसवड, ता. माण येथे प्रशासन व गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित बैठकीतही ‘वैभव व गोल्डन’ या दोन गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ साजरा करणार असल्याचे स्पष्ट केले. म्हसवड येथे शनिवारी म्हसवड नगरपरिषद, पोलीस ठाणे व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने पालिका सभागृहात गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, नगराध्यक्ष विजय धट, उपनगराध्यक्ष विजय मासाळ, प्रभारी मुख्याधिकारी विद्या पोळ, सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रांताधिकारी मुल्ला म्हणाले, ‘गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं गाव आदर्श बनविण्यासाठी पुढाकार घेऊन विधायक उपक्रम राबवून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, माणगंगा पुनर्जीवन करण्यासाठी माण नदीची स्वच्छता, वडजाई ओढा रुंदीकरण व सरळीकरण करण्यासाठी श्रमदानासाठी पुढे यावे, तुमच्याबरोबर प्रशासनही आहे,’ अशी ग्वाही दिली. तहसीलदार सुरेखा माने म्हणाल्या, ‘म्हसवड पालिकेने महिला सक्षमीकरणासाठी राबविलेली योजना कौतुकास्पद असून, ती इतरांना प्रेरणा देणारी आहे. तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत जी गावे सहभागी झाली आहेत ती गावे पाण्याने श्रीमंत झाली आहेत. ती गावे टँकरमुक्त झाली आहेत. जलसंधारणाच्या कामाला निधीची कमतरता नाही. देणारे हात हजारो आहेत. फक्त श्रमदानासाठी तरुणांनी पुढे यावे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण म्हणाले, ‘गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय कार्यालयाचा परवाना घ्यावा, मंडळांनी आवाजाची मर्यादा कायद्याप्रमाणे पालन करावे. डॉल्बीला पोलीस प्रशासन परवानगी देणार नाही. जास्त डेसीबल पेक्षा आवाज मोठा असणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)