शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पाणीटंचाईच्या दारात

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

तरतूद उन्हाळ््याची : धरणातील साठ्यांचे नियोजन करण्याचे आव्हान

सचिन काकडे - सातारा -उन्हाळा सुरू झाला नसला तरी जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुमारे ५० टक्के तर माण, खटाव तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, भाटघर या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी असला तरी सद्य:स्थिती पाहता उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे हे व्यवस्थापनापुढे आव्हान आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ८३.३६ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७२.५९ टीएमसी इतका साठा होता.यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व्यवस्थापनापुढील अनेक अडचणी सुटल्या असल्या तरी गेल्या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, खंडाळा, सातारा, कऱ्हाड, पाटण, दहिवडी या ठिकाणी सध्या पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र महाबळेश्वरला यंदा पावसाने सरासरीही न गाठल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.

फलटणमधील ६२ गावांत पाणीटंचाई
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई फलटण तालुक्यात जाणवत आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. त्यापैकी ३६ गावे नीरा उजव्या कालव्याखाली येतात. धोम-बलकवडी कालव्यामुळे ३० गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. उर्वरित ६२ गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धोम-बलकवडी कालव्याचे काम पूर्ण झाल्यास याही गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. मात्र निधीअभावी कालव्याचे काम रखडले आहे. तालुक्यातील आंदरुढ, जावली, मिरढे, वडले, दुधेबावी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, विंचुर्णी, मिरगाव आदी ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे.


धरणे आणि साठवणक्षमता
(टीएमसी मध्ये)
धरणक्षमतासध्याचा पाणीसाठा
कोयना१0५.२५८३.३६
धोम १३.५0९.१३
कण्हेर १0.१0७.६५
उरमोडी ९.९६८.९३
धोम-बलकवडी 0४.0८२.२२
येरळवाडी १.१६०.५९


माणमध्ये टँकरची मागणी
माण तालुक्यात असणारे सिमेंट बंधारे व तलावांत यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने याठिकाणी पाणीटंचाईची समस्या मिटली असली तरी इंजबाब, शंभूखेड व हवलदारवाडी याठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ग्रामस्थांनी पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बिजवडी येथे नववर्षाच्या सुरुवातील पाणीटंचाई निर्माण झाल्याने याठिकाणी विहीर अधिग्रहण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.