जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 02:00 PM2019-09-21T14:00:56+5:302019-09-21T14:01:50+5:30

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

District Surgeon Appointment of Sanjog Kadam | जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्ती

जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्तीअमोद गडीकर रजेवर : कार्यभार सांभाळण्याचे डॉ. कदम यांना आदेश

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सिव्हिलचा पद्भार सुमारे एक वर्षापूर्वी स्वीकारला होता. मात्र, त्यांना रुग्णालयामधील सुधारणांमध्ये फारसा बदल करता आला नाही. त्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेले जिल्हा रुग्णालय शेवटच्या यादीत जाऊन बसले.

रुग्णांवर वेळेत अन् योग्य उपचार होत नसल्याने अनेक रुग्णांमधून सातत्याने आरोप होत होते. तसेच सिव्हिलमधील अस्वच्छतेमुळे रुग्ण संख्येत वाढ होत गेली. डॉ. गडीकरांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून होत होता. त्यातच डॉ. गडीकरांच्या हाताखालचा लिपिक राजे याला लाच घेताना काही दिवसांपूर्वी एसीबीने पकडले होते. त्यामुळे गडीकर टिकेचे धनी बनले होते. वारंवार ते सुटी घेऊ लागले.

सध्याही ते दिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजोग कदम यांची शासनाने नियुक्ती केली आहे. डॉ. कदम यांना सिव्हिलमधील अनेक वर्षांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सिव्हिलमध्ये सुधारणा होतील, अशी अपेक्षा सातारकरांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: District Surgeon Appointment of Sanjog Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.