शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहाचे स्थलांतर अशक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 22:59 IST

बोरवणकर यांची स्पष्टोक्ती : पुरुष बंदिवानांसाठी लवकरच जादा बराकी

सातारा : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कारागृहाच्या परिसरात नियमांमुळे खुंटलेल्या विकासाच्या मुद्द्यावरून पालिकेत गरमागरम चर्चा झाल्या. आमदारांनीही जिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्याची मागणी केली; मात्र नजीकच्या काळात असे काहीही घडणे शक्य नसल्याचे संकेत राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी मंगळवारी दिले.साताऱ्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या बोरवणकर यांनी जिल्हा कारागृहाची नियमित तपासणी केली. सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत पाहणी केल्यानंतर कारागृहाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा कारागृह सध्याच्या जागेपासून अन्यत्र स्थलांतरित करणे अनेक कारणांनी अव्यवहार्य असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, ‘कारागृह स्थलांतराचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. तथापि, कारागृह पोलीस मुख्यालयाजवळच असायला हवे. यामुळे बंदिवानांना न्यायालयात तसेच रुग्णालयात नेताना-आणताना, पोलिसांचा ‘एस्कॉर्ट’ तातडीने उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे कारागृह रुग्णालयापासूनही जवळ असावे, असे माझे मत आहे.’सातारा जिल्हा कारागृहातील कामकाज चांगले असून, अंतर्गत स्वच्छताही उत्तम असल्याचे सांगून कैद्यांच्या संगणकीकृत डेटाबेसविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘चार मोड्यूलमध्ये संगणकीकरणाचे काम सुरू आहे. ‘प्रिझन’ नावाच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने राज्यातील कैद्यांची माहिती संगणकीकृत करण्यात येत असून, ती शासनाच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केली जात आहे. सातारा कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर येथील बंदिवानांची माहितीही आॅनलाइन उपलब्ध होईल.’१९९६ ते १९९९ या काळात सातारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मीरा बोरवणकर यांनी आपल्याला सातारला यायला आवडते, असे सांगितले. पूर्वीपेक्षा यावेळी शहराची लोकसंख्या थोडी वाढल्याचे दिसले, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘सातारचे सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे तरुण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, ते अतिशय उत्तम काम करीत आहेत.’ यानंतर बोरवणकर यांनी पोलीस कवायत मैदानाला भेट दिली. (प्रतिनिधी)नव्या बराकीसाठी निधीयावेळी बोलताना बोरवणकर म्हणाल्या, ‘पुरुष बंदिवानांसाठी सध्याची जागा अपुरी पडत आहे. सध्या १७० बंदिवानांची सोय येथे उपलब्ध असताना प्रत्यक्षात सुमारे तीनशे बंदिवान आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, नव्या बराकीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. बराकीबरोबरच सोलर पॅनेलही उभारण्यात येणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कारागृहात मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कर्मचाऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास अनुकूल आहेत.’