शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनानगर आपत्तीग्रस्तांबाबत जिल्हा प्रशासन असंवेदनशील : देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

सातारा : ‘कोयना धरण क्षेत्र परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पाटण तालुक्यातील पाच व कऱ्हाड तालुक्यातील सात अशा बारा ...

सातारा : ‘कोयना धरण क्षेत्र परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील पाटण तालुक्यातील पाच व कऱ्हाड तालुक्यातील सात अशा बारा भूस्खलन व पूरस्थिती झालेल्या गावांमध्ये पुनर्वसनासह मूलभूत सुविधांच्या केवळ शासकीय घोषणा झाल्या. प्रत्यक्षात या सुविधा पूर्णतः स्वरूपात येथील नागरिकांना पोहोचल्या नाहीत. नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासन अत्यंत असंवेदनशील आहे,’ असा आरोप लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी केला.

मुक्तांगण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोयना क्षेत्रातील कामरगाव, हुंबरळी, तोरणे, ढोकावळे, हेळवाक, कोयनानगर रासाटी, दास्ताने, गोष टवाडी, शिरळ त्रिपुडी म्हावशी येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सात गावांत पूर्ण क्षमतेने मदत पोहोचली नाही. गृहराज्यमंत्री व पालकमंत्री यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रुग्णांना साधी रुग्णवाहिका मिळू शकत नाही. व्याघ्र प्रकल्पातील गावांना केवळ वर्षभर अनुदानित सिलिंडर मिळाले. मात्र गेल्या दोन वर्षात तेही मिळाले नाहीत. वनविभागाच्या मालकीच्या डोंगर क्षेत्रातील भूस्खलनाची पाहणी करायला वनविभागाचे कर्मचारी फिरकलेसुध्दा नाहीत. या बारा गावांतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची भेट घेतली. पुनर्वसनाच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, मात्र गणेशोत्सवापूर्वी आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन होणे शक्य नाही अशी साचेबद्ध उत्तरे दिली. या गावांमध्ये एनडीआरएफला लागणारी किट आमच्या वतीने पुरविण्यात आली. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची केवळ नौटंकी चालविली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीत अधीक्षक यांना सहकार्य मागूनही त्यांनी काहीच सहकार्य केले नाही. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख शेखर ताम्हाणे हा अधिकारी कायम नॉटरिचेबल असतो असा आरोप ॲड. देशपांडे यांनी केला.

चौकट

ऐंशी बंगले ताब्यात घेण्यासाठी आंदोलन

कोयना क्षेत्रातील गावांना मोफत धान्य वितरण. रस्ते व वीज सुविधा, त्यांचे पुनर्वसन, पाणी पुरवठा योजनांचे पूर्णत्व, मोफत गॅस सिलिंडर वाटप, इत्यादी मूलभूत सोयीचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. कोरोनाच्या या लाटेत या विभागातील २२ जणांचा बळी गेला. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने या नागरिकांचे स्वतंत्र पुनर्वसन अत्यावश्यक आहे. या प्रश्नाचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा कोयना प्रकल्पाचे रिकामे ८० बंगले ताब्यात घेण्याचे आंदोलन करण्यात येऊन तेथे या आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करू, अशा इशारा ॲड. देशपांडे यांनी दिला.