जिल्हा परिषद सदस्य संघटना महिला जिल्हाप्रमुखपदी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST2021-08-13T04:45:15+5:302021-08-13T04:45:15+5:30

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा महिला प्रमुखपदी जिल्हा परिषद व नियोजन समितीच्या सदस्या ...

Deshmukh as Zilla Parishad Member Association Women's District Head | जिल्हा परिषद सदस्य संघटना महिला जिल्हाप्रमुखपदी देशमुख

जिल्हा परिषद सदस्य संघटना महिला जिल्हाप्रमुखपदी देशमुख

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा महिला प्रमुखपदी जिल्हा परिषद व नियोजन समितीच्या सदस्या अर्चना देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, माजी सदस्य यांच्या अडीअडचणी सुटाव्यात, त्यांना एक व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने पक्षविरहित संघटनेची स्थापना संस्थापक-अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांनी केली आहे. राज्य संघटक भारत शिंदे यांच्या पुढाकाराने ही संघटना राज्यभरातील सदस्यांना एकत्र करत आहे. काही महिन्यांपूर्वी या संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता महिला जिल्हा प्रमुखपदावर कोडोली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अर्चना देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष मंगेश धुमाळ यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी सुनील सावंत उपस्थित होते. या निवडीबद्दल अर्चना देशमुख यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला.

फोटो दि.१२सातारा झेडपी देशमुख फोटो (मेल)

फोटो आवश्यक....

फोटो ओळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या सातारा जिल्हा महिला प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अर्चना देशमुख यांना मंगेश धुमाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी सुनील सावंत उपस्थित होते.

\\\\\\\\\\\\\

Web Title: Deshmukh as Zilla Parishad Member Association Women's District Head