शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्वर देवस्थानकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची रुग्णवाहिकेअभावी होणारी गैरसोय जाणून ...

पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची रुग्णवाहिकेअभावी होणारी गैरसोय जाणून सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या हस्ते केले.

यावेळी देवस्थानचे सचिव अविनाश लेंभे, डॉ. महाजन, विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक प्रबोधनाचे अधिष्ठान म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यात श्री सोळा शिवलिंगे शनैश्वर देवस्थानाचा सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर‌ लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांशी काळ धार्मिक स्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळांकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांवर मर्यादा येत असताना देखील देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी परिसरातील जनतेची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने रुग्णवाहिका खरेदी करून तिचे लोकार्पण केले.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नेहमीच सामाजिक हिताचे उपक्रम राबविले जातात. सामान्य जनतेचे रुग्णवाहिकेअभावी होणारे हाल लक्षात घेऊन ट्रस्टने रुग्णवाहिका लोकार्पित केली आहे. यापुढेही परिसरातील जनतेच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी शनैश्वर देवस्थान प्रयत्नशील राहील.

- शिवयोगी नंदगिरी महाराज मठाधिपती,

शनैश्वर देवस्थान, सोळशी